Join us   

बीपी सतत वाढतं? ६ पदार्थ नियमित खा, बीपी राहील नॉर्मल आणि तब्येत ठणठणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2023 4:30 PM

1 / 7
खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे तसेच हवा तसा व्यायाम न झाल्याने आजकाल कमी वयातच अनेकांना बीपीचा त्रास होत आहे. हा त्रास मागे लागू नये म्हणून किंवा बीपी असेलच तर ते नियंत्रणात राहावे म्हणून हे काही पदार्थ नियमितपणे खा...
2 / 7
योगर्टमध्ये प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स, खनिजे आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे दिवसातून एकदा तरी योगर्ट खावे.
3 / 7
शरीरातील पोटॅशियम कमी झाले की रक्तदाबाचा त्रास होतो. हा त्रास कमी करण्यासाठी नियमितपणे केळी खावी. केळीमध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते.
4 / 7
स्ट्रॉबेरीसारख्या बेरी प्रकारातील फळे खाल्ल्याने बीपी नियंत्रित राहाते. दिवसातून २८ ग्रॅम एवढे जरी हे फळ खाल्ले तरी ते पुरेसे आहे.
5 / 7
हिरव्या पालेभाज्यांमधून मॅग्नेशियम आणि पोटॅशियम भरपूर मिळते. त्यामुळे आठवड्यातून ३ ते ४ वेळा तरी हिरव्या पालेभाज्या खायलाच पाहिजेत.
6 / 7
National Institutes of Health यांनी केलेल्या एका अभ्यासानुसार रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी उपयुक्त असणारे घटक लसूणामध्ये भरपूर प्रमाणात असतात.
7 / 7
ब्रोकोलीमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे त्यांच्या नियमित सेवनामुळे हृदयरोगाचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होतो.
टॅग्स : वेट लॉस टिप्सअन्नआहार योजनाहेल्थ टिप्स