पोटावर वाढलेली चरबी कमी करायची? आहारात हवेतच ६ सूपरफूड; नव्या वर्षात करा पोट कमी By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2022 5:00 PM 1 / 7पोटावरची वाढलेली चरबी ही अनेकांपुढील एक मोठी समस्या असते. एकदा ही चरबी जमा व्हायला लागली की लवकर कमी व्हायचे नाव घेत नाही. त्यासाठी व्यायाम तर करावा लागतोच. पण त्याचबरोबर आहारातही काही महत्त्वाचे बदल करावे लागतात. पाहूयात आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश केला तर पोटावरची चरबी कमी होण्यास मदत होते (6 Superfood For Reducing Belly Fat). 2 / 7ओवा हा आपल्या स्वयंपाकघरातील एक अतिशय महत्त्वाचा पदार्थ असून ओव्याचे बरेच औषधी गुणधर्म आहेत. ओव्यामुळे खाल्लेले अन्न पचण्यास मदत होते आणि शरीरात चरबी साठून राहण्यापासून ओव्याचा चांगला उपयोग होतो. त्यामुळे नकळतच वजन कमी होण्यासाठी ओवा फायदेशीर असतो. 3 / 7मूग डाळ ही पचायला अतिशय हलकी असणारी डाळ आहे. त्यामुळे आहारात या डाळीचा समावेश करायला हवा असे आहारतज्ज्ञ आवर्जून सांगतात. मूगाच्या डाळीत प्रोटीन आणि फायबर जास्त असल्याने वजन कमी होण्यासाठी मूगाची डाळ फायदेशीर ठरते. त्यामुळे एक वाटी मूगाचे वरण खाल्ले तरी आपल्याला लगेच पोट भरल्यासारखे वाटते. 4 / 7दूधी भोपळा पाहून अनेक जण नाक मुरडतात. पण दुधी आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर अशी भाजी आहे. ही भाजी फॅट फ्री असल्याने आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण चांगले ठेवण्यासाठीही दुधी आवर्जून खायला हवा. 5 / 7दलिया म्हणजेच अर्धवट फोडलेले गहू, दलियाचा भाज्या घालून उपमा किंवा गोड खीर असे काहीही करता येते. दलियामध्ये प्रोटीन्स जास्त प्रमाणात असून फॅटस कमी प्रमाणात असतात. त्यामुळे पोटावरची चरबी कमी होण्यासाठी दलिया खाणे फायदेशीर ठरते. 6 / 7तुळशीचे बी किंवा सब्जा यांमध्ये व्हिटॅमिन ए, इ, के आणि बी अतिशय चांगल्या प्रमाणात असतात. तसेच यामध्ये फायबरही मोठ्या प्रमाणात असल्याने जेवणाच्या आधी यांचे सेवन केल्यास आपण नकळत जेवण कमी करतो आणि जास्तीचे न खाल्ले गेल्याने पोटाची चरबी नियंत्रणात राहते. 7 / 7ताकामुळे पचनक्रिया सुरळीत राहण्यास मदत होते. तसेच दह्यात प्रोबायोटीक्सचे प्रमाण चांगले असेल्याने पचन सुरळीत होण्यासाठी दही आण ताक अतिशय आवश्यक असते. खाल्लेल्या अन्नाचे पचन चांगले झाले तर शरीरात अनावश्यक चरबी साठत नाही आणि त्यामुळे पोटावरची चरबी वाढत नाही. आणखी वाचा Subscribe to Notifications