1 / 9वजन कमी करायचे असेल तर आपण आपल्या खाण्या-पिण्यावर थोडे निर्बंध आणतो. वजन कमी करण्यासाठी काही पदार्थ खाणे (6 Vegetables to Avoid if Trying to Lose Weight) कटाक्षाने टाळावेच लागतात. 2 / 9वजन कमी करण्यासाठी (Weight Loss Tips) बरेचदा आपण आपल्या आहारात भाज्यांचा समावेश करतो. कारण त्यात कमी कॅलरीज आणि जास्त पोषक तत्वे असतात. वजन कमी करण्यासाठी भाज्या खाणे फायदेशीर असेल तरीही काही भाज्या आहेत ज्या तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रवासातील अडथळा ठरु शकतात. 3 / 9काही भाज्या अशा आहेत ज्या खाल्ल्याने तुमचे वजन कमी (6 Vegetables To Avoid for Weight Loss ) होण्याऐवजी वाढू शकते. यासाठी, वजन कमी करताना आहारात या ६ भाज्यांचा समावेश चुकूनही करु नका.4 / 9बटाट्याची भाजी प्रत्येक घराघरात हमखास बनवली जाते. बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे शरीरातील उर्जेची पातळी वाढते. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर बटाटे मर्यादित प्रमाणात खावेत. बटाट्यामध्ये स्टार्चचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे वजन वाढू शकते . याशिवाय तळलेले बटाटे किंवा फ्रेंच फ्राईज अजिबात खाऊ नयेत.5 / 9मटार खाणे आरोग्यासाठी पौष्टिक मानले जातात. मटारमध्ये प्रथिने आणि फायबर भरपूर असतात. याचबरोबर, त्यात भरपूर कार्बोहायड्रेट्स देखील असतात, ज्यामुळे वजन वाढू शकते. जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी डाएट फॉलो करत असाल तर मटार मर्यादित प्रमाणात खा. मटार जास्त प्रमाणात खाल्ल्याने कॅलरीजचे प्रमाण वाढू शकते.6 / 9रताळे खाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते, कारण त्यात व्हिटॅमिन ए, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. पण त्यात कार्बोहायड्रेट्स आणि साखरेचे प्रमाणही जास्त असते. यामुळे रताळं जास्त प्रमाणांत खाल्ल्यास वजन वाढू शकते. यासाठीच वजन कमी करताना रताळं खाणं टाळावं. 7 / 9मक्याचे कणीस भाजून किंवा उकडवून खायला सगळ्यांचं आवडते. परंतु मक्याच्या कणसात कार्बोहायड्रेट्स आणि कॅलरीज जास्त प्रमाणांत असतात. यासाठी वजन कमी करताना आपल्या डाएटमध्ये मक्याचा समावेश करु नये. बटर कॉर्न किंवा क्रिमी कॉर्न सारख्या पदार्थांपासून दूर राहावे.8 / 9अरबीच्या भाजीत स्टार्चचे प्रमाण जास्त असते. यामुळे तुमचे वजन वाढू शकते. जर तुम्ही वजन कमी करत असाल तर अरबी मर्यादित प्रमाणात खावी. याशिवाय, तुपात तळून किंवा शिजवून अरबी खाणे शक्यतो टाळावे.9 / 9बहुतेक भाज्यांमध्ये कांद्याचा वापर त्यांची चव वाढवण्यासाठी केला जातो. कांद्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आणि साखरेचे प्रमाण जास्त असते. जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी डाएट फॉलो करत असाल तर तुम्ही कांदा कमी प्रमाणांत खावा. याशिवाय, कांदे तळून किंवा भाजून खाणे टाळावे.