Join us   

ओमेगा ३ ॲसिड देणारे ६ पदार्थ रोज खा, खर्चही अगदी किरकोळ -आणि त्वचेसह केसही सुंदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2024 5:27 PM

1 / 7
सौंदर्य आणि आराेग्य या दोन्ही गोष्टी जपण्यासाठी ओमेगा ३ फॅटी ॲसिड अतिशय उपयुक्त ठरते.
2 / 7
जवसाच्या बियांमधून उत्तम प्रमाणात ओमेगा ३ मिळतं. त्यामुळे शरीरातील बॅड कोलेस्ट्राॅल कमी होण्यासही मदत होते..
3 / 7
अक्रोड हा देखील ओमेगा ३ चा उत्तम स्त्रोत मानला जातो. दररोज सकाळी भिजवलेले अक्रोड खाणे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले मानले जाते.
4 / 7
१ कप राजमा खाल्ल्यास त्यातून २१० मिग्रॅ. ओमेगा मिळतं.. मानसिक स्वास्थ्य उत्तम ठेवण्यासाठी, नैराश्य दूर करण्यासाठीही ओमेगा ३ उपयुक्त ठरतं.
5 / 7
ओमेगा ३ च्या बाबतीत अतिशय समृद्ध असणारे चिया सीड्स शरीराला आवश्यक असणारे अनेक खनिजे देतात. त्यातून कॅल्शियमही उत्तम प्रमाणात मिळतं.
6 / 7
सोयाबीन तेलातूनही ओमेगा ३ चांगल्या प्रमाणात मिळतं. रोजच्या स्वयंपाकासाठी सोयाबीन तेल वापरल्यास तुमची ओमेगा ३ ची गरज बऱ्याच प्रमाणात भागवली जाऊ शकते.
7 / 7
पालकाची भाजी हा देखील ओमेगा ३ चा चांगला स्त्रोत आहे.अल्झायमरचा त्रास होऊ नये म्हणूनही ओमेगा ३ शरीरात चांगल्या प्रमाणात असणं गरजेचं आहे.
टॅग्स : वेट लॉस टिप्सअन्नआरोग्यहेल्थ टिप्स