Join us   

थंडीच्या दिवसांत इम्युनिटी वाढवण्यासाठी नियमित खा ७ पदार्थ, तब्येत वर्षभर ठणठणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2023 4:49 PM

1 / 10
१. हिवाळ्यात सर्दी- खोकला, शिंका- नाक गळणे असे त्रास सारखे होत असतात. घरात एकाला हा त्रास सुरू झाला की मग सगळ्यांनाच त्याची लागण होते. यातून बरं होण्यासाठी मग हमखास ४- ५ दिवस लागतात. म्हणूनच या आजारांना बळी पडायचं नसेल आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवून ठणठणीत रहायचं असेल तर आपल्या स्वयंपाक घरातच अगदी सहज उपलब्ध असणाऱ्या या काही पदार्थांची मदत घ्या.
2 / 10
लाईफस्टाईल एक्सपर्ट वंदना जुनेजा यांच्या अभ्यासानुसार आपल्या स्वयंपाक घरात असणाऱ्या वेगवेगळ्या मसाल्यांचा उपयोग केवळ पदार्थाची चव वाढविण्यापुरताच मर्यादित नसतो. तर हे मसाले आरोग्यासाठीही अतिशय उपयुक्त असतात. म्हणूनच थंडीच्या दिवसांत कोणते मसाले आवर्जून आपल्या आहारात असावेत, याविषयीची ही माहिती.
3 / 10
३. लवंगमध्ये ॲण्टी ऑक्सिडंट्स, ॲण्टी मायक्रोबियल आणि ॲण्टी व्हायरल घटक मोठ्या प्रमाणावर असतात. तसेच त्यात असणारे अनेक व्हिटॅमिन्स आणि खनिजे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी फायदेशीर ठरतात.
4 / 10
४. मिऱ्यांमध्ये ॲण्टीबायोटिक गुणधर्म असतात. त्यामुळे त्यातून आजाराशी लढण्याची ताकद, उर्जा शरीराला मिळते. मिऱ्यांमध्ये व्हिटॅमिन सी देखील असतं. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी त्यांचा उपयोग होतो.
5 / 10
५. वेलचीमध्ये ॲण्टीऑक्सिडंट्स आणि वेगवेगळी खनिजे मोठ्या प्रमाणावर असतात. इम्युनिटी वाढविण्यासाठी वेलची उपयुक्त मानली जाते.
6 / 10
६. ॲण्टी बॅक्टेरियल, ॲण्टी व्हायरल आणि ॲण्टी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असणारी हळद औषधी आहे, हे आपण जाणतोच. त्यामुळेच थंडीच्या दिवसांत सर्दी, खोकला, घसादुखी असा त्रास झाल्यास आयुर्वेदानुसार हळदीचं दूध पिण्याचा सल्ला दिला जातो.
7 / 10
७. रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी दालचिनी तर उपयुक्त आहेच पण रक्तातील साखरेचे प्रमाण नियंंत्रित ठेवण्यासाठीही दालचिनीचा उपयोग होतो.
8 / 10
८. बडिशेपला काही अभ्यासानुसार हिलिंग फूड म्हणूनही ओळखलं जातं. पोटाच्या तक्रारी दूर करण्यासाठी बडिशेप अतिशय उपयुक्त मानली जाते. तसेच त्यात असणारे व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारक शक्ती वाढवून संसर्गजन्य आजारांपासून दूर राहण्यासाठी मदत करते.
9 / 10
९. जायफळमध्येही ॲण्टी बॅक्टेरियल गुणधर्म मोठ्या प्रमाणावर असतात.
10 / 10
१०. हळद अणि बडिशेप वगळता अन्य मसाले तुम्ही चहामध्ये वापरू शकता. हे सर्व मसाले टाकून घरच्याघरी चहा मसाला तयार करा आणि दिवसभरातून होणाऱ्या एका चहामध्ये तरी चिमुटभर मसाला टाका.
टॅग्स : वेट लॉस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्सथंडीत त्वचेची काळजी