हिवाळ्यात खायलाच हवेत असे ७ सुपर सिड्स! ऊर्जेचा छोटा पॅकेट, बडा धमाका - खा भरपूर By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2022 4:24 PM 1 / 8सगळ्या ऋतूंपैकी हिवाळ्यात आपल्याला आपल्या खाण्या - पिण्याची व डाएटची आवर्जून काळजी घ्यावी लागते. हिवाळ्यात जास्त थंडी असल्याने आपल्याला फारशी तहान नाही लागत त्यामुळे आपण पाणी कमी पितो. यामुळे आपले शरीर डिहायड्रेटेड होण्याची शक्यता असते. थंडीमध्ये आपण ज्या वस्तूंपासून शरीराला जास्त गर्मी किंवा ऊब मिळते अशा गोष्टींचे सेवन करतो. एवढेच नव्हे तर हिवाळ्यात आपण आपल्या जेवणात जास्त गरम पदार्थांचा समावेश करतो. हिवाळ्यात आपण गूळ, तीळ, मध, आलं, साजूक तूप, केसर यांसारख्या गरम पदार्थांचे सेवन करतो. यासोबतच आपण शरीराला ऊर्जा मिळावी म्हणून फळ, भाज्या यांचे सेवन करतो. थंडीत आपली इम्युनिटी पॉवर वाढविण्यासाठी फळ, भाज्या, ड्रायफ्रुटस यांच्या सोबतच काही उपयोगी सीड्सचे सेवन केल्यास आपण तंदुरुस्त राहू शकतो(7 Super Seeds That Must Be Eaten In Winter).2 / 8चिया सीड्स हे एकदम बारीक तीळाप्रमाणे दिसणारे असतात. यात ओमेगा - ३ फॅटी अॅसिडचे प्रमाण सर्वात जास्त असते. चिया सीड्समध्ये, अँटीऑक्सिडंट, फायबर, आयर्न व कॅल्शियम असतात. यात फायबर असल्यामुळे याचे सेवन केल्यास भरपूर वेळ तुमचे पोट भरलेले राहते, यामुळे तुमच्या ओव्हरइटिंगचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. 3 / 8अळशी आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. अळशी खाण्याचे शरीरासाठी अनेक फायदे आहेत. अळशीमध्ये व्हिटॅमिन - ई, ओमेगा-३ फॅटी अॅसिड असतं. यामुळे हृदय आणि मेंदूचं आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत होते. अळशी व्हिटॅमिन - बी चा उत्तम स्त्रोत आहे. रोज एक चमचा अळशी खाल्याने त्वचा मॉइस्चराइज राहण्यास मदत होते. यात असणारं व्हिटॅमिन ई केसांचं आरोग्य राखण्यासही फायदेशीर ठरतं.4 / 8सूर्यफुलांच्या बियांमध्ये व्हिटॅमिन-ई मुबलक प्रमाणत असते त्यामुळे केसांसाठी ते फायदेशीर ठरतं. मासिक पाळीच्या वेळी होणारी चिडचिड, मूड स्विंग, पोटदुखी यासारखे त्रास कमी होतात. सूर्यफुलांच्या बियामध्ये कॅल्शिअमही खूप असते त्यामुळे कॅल्शिअमची कमतरता भरून काढण्यासाठी सूर्यफुलाच्या बिया खाणं फायदेशीर ठरतं.5 / 8भोपळ्याच्या बियांमध्ये व्हिटॅमिन - ई भरपूर प्रमाणात असतं. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. परिणामी आरोग्यविषयक समस्या दूर राहतात. भोपळ्याच्या बियांमध्ये अँटी एजिंग गुणधर्म असतात. यामुळे चेहऱ्यावरची मुरमं कमी होतात. तसंच त्वचेवरची वृद्धत्वाची लक्षणंही कमी होतात. 6 / 8खरबूजाच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम असते जे रक्तदाब कमी करण्यास मदत करते, ज्यामुळे हृदय निरोगी राहते. शाकाहारी लोकांसाठी खरबुजाच्या बिया हा प्रथिनांचा एक उत्तम पर्याय आहे. खरबुजाप्रमाणेच त्याच्या बियांमध्ये देखील व्हिटॅमिन - ए असते, जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. 7 / 8खसखस हे फायबरसारख्या खास पोषक तत्वांनी समृद्ध आहे. जे पोटांशी संबंधित बद्धकोष्ठ आणि गॅससारख्या समस्या दूर ठेवण्यास मदत करते. मेंदूच्या विकासासाठी खसखस खाणे फार उपयुक्त ठरते. यामध्ये असलेले कॅल्शियम, लोह आणि कॉपर ही पोषक तत्व मेंदूचा विकास करण्यासाठी उपयुक्त ठरतात.8 / 8आहारामध्ये तिळ खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. गोडाधोडाचे पदार्थ किंवा डेझर्टचा स्वाद वाढवण्यासाठीही तिळाचा वापर केला जातो. तिळातील कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरससारखे घटक हाडांसाठी पोषक ठरतात. थंडीच्या दिवसात रोज एक चमचाभर तीळ खाल्ल्याने हाडं किंवा सांधेदुखीचा त्रास जाणवणार नाही. त्वचा मुलायम राहण्यासाठीही तीळ उपयुक्त असतात. त्यामुळे त्वचा कोरडी पडू नये यासाठी थंडीच्या सुरुवातीपासूनच तीळ खाल्ल्यास त्वचा कोरडी पडण्याचे प्रमाण कमी होते. आणखी वाचा Subscribe to Notifications