Join us   

सायंकाळी भूक लागली की वाट्टेल ते खाता? ‘या’ ८ पैकी १ तरी पदा‌र्थ खा, प्रोटीन मिळेल भरपूर - वजनही घटेल झरझर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2024 4:53 PM

1 / 10
अनेकांना सायंकाळची प्रचंड भूक लागते (Weight Loss). सायंकाळी भूक लागल्यावर आपण उलट - सुलट किंवा चटपटीत नमकीन पदार्थ खातो (Fitness). सायंकाळची छोटी भूक या पदार्थांमुळे भागली जाते. पण हे पदार्थ आरोग्यासाठी घातक ठरतात. यामुळे वजन तर वाढतेच, शिवाय गंभीर आजारांचा धोकाही वाढतो(8 Foods That Help You Lose Weight and Fill You Up).
2 / 10
जर सायंकाळी ४ नंतर छोटी भूक लागली असेल तर, प्रोटीन आणि कार्ब्सयुक्त पदार्थ खा. प्रोटीन आणि कार्ब्सयुक्त पदार्थ खाल्ल्याने शरीराला पोषण तर मिळते. शिवाय वेट लॉसही होते. जर आपल्याला उलट सुलट पदार्थ खायचं नसेल तर, ८ प्रकारचे पदार्थ खाऊन पाहा. वेट लॉस होईल; पोटही भरेल.
3 / 10
फळे जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबरचा समृद्ध स्रोत असतात. यामुळे पचनक्रिया सुधारणे, ऊर्जा पातळी वाढवण्यास आणि रोगप्रतिकारक शक्तीला चालना देण्यास मदत होते. आपण नियमित एक फळ सकाळी खाऊ शकता.
4 / 10
सायंकाळची भूक भागावण्यासाठी आपण सँडविच खाऊ शकता. सँडविचमध्ये भाज्यांचा वापर होतो. ड, चीज, टोमॅटो आणि लेट्यूसमधील पौष्टिक घटक शरीराला पोषण देते.
5 / 10
सकाळी रिकाम्या पोटी ड्रायफ्रूटस खाण्याचे अनेक फायदे आहेत. बदाम, अक्रोड, मनुका, सूर्यफुलाच्या बिया इत्यादी गोष्टी खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते. यासह आरोग्यासाठीही चांगले असतात.
6 / 10
दही प्रोटीन आणि कॅल्शियमचा चांगला स्रोत आहे. दह्यामध्ये फळे आणि भाज्या खाल्ल्याने आरोग्याला भरपूर पोषण मिळते.
7 / 10
दुपारच्या जेवणात सॅलड खाणे शक्य नसेल तर संध्याकाळी खा. चीज, सोया नगेट्स, ड्रायफ्रुट्स, किंवा भाज्या घालून आपण सॅलॅड तयार करू शकता.
8 / 10
पीनट बटर तब्येतीसाठी उत्तम ठरते. पीनट बटर प्रोटीन्सनी परिपूर्ण असते. प्रति १०० ग्राम पीनट बटरमध्ये जवळपास २५ ग्राम प्रोटीन असते.
9 / 10
भोपळ्याच्या बीया मॅग्नेशियम, आयर्न आणि प्रोटीन्सचा स्त्रोत आहे. अर्धा कप भोपळ्याच्या बियांमध्ये १६ ग्राम प्रोटीन असते.
10 / 10
एक कप चिरलेल्या पालकमध्ये ५ ग्राम प्रोटीन्स असतात. यात आयर्नचे प्रमाणही असते. पालक कॅल्शियमचा सगळ्यात मोठा स्त्रोत आहे.
टॅग्स : वेट लॉस टिप्सहेल्थ टिप्सआरोग्यफिटनेस टिप्स