वजन घटवायचं तर आहारात असलेच पाहिजेत ९ पदार्थ... पचनक्रिया राहील परफेक्ट आणि वेटलॉसचा वाढेल वेग

Published:July 26, 2022 01:12 PM2022-07-26T13:12:43+5:302022-07-26T13:18:44+5:30

वजन घटवायचं तर आहारात असलेच पाहिजेत ९ पदार्थ... पचनक्रिया राहील परफेक्ट आणि वेटलॉसचा वाढेल वेग

१. शरीरावर अतिरिक्त चरबी साचू नये, असं वाटत असेल तर आपले मेटाबॉलिझम म्हणजेच चयापचय क्रिया उत्तम असणं गरजेचं आहे. म्हणूनच ही क्रिया व्यवस्थित राहण्यासाठी काही अन्नपदार्थ नियमितपणे खाणं गरजेचं आहे. त्याचीच ही यादी. हे पदार्थ जर तुमच्या आहारात नियमितपणे असतील, तर मेटाबॉलिझम व्यवस्थित होईल आणि आपोआपच वेटलॉस होण्यास मदत होईल.

वजन घटवायचं तर आहारात असलेच पाहिजेत ९ पदार्थ... पचनक्रिया राहील परफेक्ट आणि वेटलॉसचा वाढेल वेग

२. लो फॅट मिल्क- दुधामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी भरपूर प्रमाणात असतात. कॅल्शियम योग्य प्रमाणात असेल तर फॅट्सचं मेटाबॉलिझम अधिक चांगल्या पद्धतीने होतं. त्यामुळे नियमितपणे दूध घ्या पण त्यात फॅट्स आणि कॅलरी यांचं प्रमाण कमी असावं. दूध शक्यतो नाश्त्यामध्ये घ्यावं.

वजन घटवायचं तर आहारात असलेच पाहिजेत ९ पदार्थ... पचनक्रिया राहील परफेक्ट आणि वेटलॉसचा वाढेल वेग

३. ब्रोकोली- फॅट बर्न आणि मेटाबॉलिझम या दोन्ही बाबतीत ब्रोकोली अतिशय परिणामकारक आहे. ब्रोकोलीमध्ये असणारे डाएटरी फायबर, प्रोटीन्स, खनिजे, व्हिटॅमिन्स यामुळे मेटाबॉलिझम रेट वाढविण्यासाठी ती परफेक्ट ठरते. शिवाय ब्रोकोली ब्लड शुगर लेव्हल कमी करण्यासही उपयुक्त आहे.

वजन घटवायचं तर आहारात असलेच पाहिजेत ९ पदार्थ... पचनक्रिया राहील परफेक्ट आणि वेटलॉसचा वाढेल वेग

४. लाल मिरची- लाल मिरचीमध्ये असणारे capsaicin हे कम्पाऊंड मेटाबॉलिझम वाढण्यासाठी आणि पचनक्रियेचा वेग वाढविण्यासाठी उपयुक्त ठरते. त्यामुळे फॅट बर्न होण्याची क्रिया अधिक वेगवान होते.

वजन घटवायचं तर आहारात असलेच पाहिजेत ९ पदार्थ... पचनक्रिया राहील परफेक्ट आणि वेटलॉसचा वाढेल वेग

५. ग्रीन टी- ग्रीन टी मध्ये असणारे ॲण्टीऑक्सिडंट्स आणि पॉलीफेनॉल मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी वाढविण्यासाठी मदत करतात. शिवाय त्यात असणारे फ्लेवोनॉईड एनर्जी लेव्हल वाढविण्यासाठी मदत करतात.

वजन घटवायचं तर आहारात असलेच पाहिजेत ९ पदार्थ... पचनक्रिया राहील परफेक्ट आणि वेटलॉसचा वाढेल वेग

६. लिंबू- आणि लिंबूवर्गीय फळे या फळांमधले व्हिटॅमिन सी शरीरातील सेल्स फंक्शन ॲक्टीवेट करण्यासाठी मदत करतात.

वजन घटवायचं तर आहारात असलेच पाहिजेत ९ पदार्थ... पचनक्रिया राहील परफेक्ट आणि वेटलॉसचा वाढेल वेग

७. योगर्ट- प्रोबायोटिकचा उत्तम स्त्रोत म्हणून योगर्ट ओळखलं जातं. त्यामुळे पचनक्रिया सुधारण्यासाठी त्याचा उपयोग होतो. त्यामुळे १ कप योगर्ट रोज स्मुदी किंवा सलाडसोबत खाणं उत्तम मानलं जातं.

वजन घटवायचं तर आहारात असलेच पाहिजेत ९ पदार्थ... पचनक्रिया राहील परफेक्ट आणि वेटलॉसचा वाढेल वेग

८. बदाम- बदाममध्ये असणारं प्रोटीन्सचं प्रमाण मेटाबॉलिझम उत्तम ठेवतं. त्यांच्यात फायबर, प्रोटीन्स, ओमेगा ३ फॅटी ॲसिड जास्त असतात. त्यामुळे त्यांना मेटाबॉलिझम बुस्टर म्हणून ओळखलं जातं. दररोज ४ बदाम आणि इतर सुकामेवा खाल्ला तरी पुरेसं आहे.

वजन घटवायचं तर आहारात असलेच पाहिजेत ९ पदार्थ... पचनक्रिया राहील परफेक्ट आणि वेटलॉसचा वाढेल वेग

९. लसूण- लसूणमध्ये असणारं ॲसिलीन रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास तसेच मेटाबॉलिझम उत्तम ठेवून फॅट बर्न करण्यास उपयुक्त ठरतं.

वजन घटवायचं तर आहारात असलेच पाहिजेत ९ पदार्थ... पचनक्रिया राहील परफेक्ट आणि वेटलॉसचा वाढेल वेग

१०. पालक- पालकामध्ये व्हिटॅमिन बी मोठ्या प्रमाणात असतं. त्यात असणारं लोह ऑक्सिजन लेव्हल योग्य राखण्यास मदत करतं. त्यामुळे आपल्या स्नायुंना फॅट बर्न करण्यासाठी आपोआपच उर्जा मिळते.