पोट, मांड्या फार सुटल्यात? जेवणात 'ही' भाजी खा, पोटावरची चरबी होईल कमी-स्लिम दिसाल By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2024 9:04 AM 1 / 7पोषक तत्वांनी परिपूर्ण फ्लॉवरची भाजी खाल्ल्याने तब्येतीला बरेच फायदे मिळतात. यात फायबर्स, व्हिटामीन बी, व्हिटामीन सी, कॅल्शियम, मँन्गनीज या पोषक तत्वांनी परिपूर्ण असते. जे लोक वजन कमी करण्याच्या प्रयत्नात आहेत त्यांनी आहारात या भाजीचा समावेश करायला हवा. यात कमीत कमी फॅट्स आणि प्रोटीन्स जास्त असतात. 2 / 7फायबर्सचे प्रमाण जास्त असते. याव्यतिरिक्त यात एंटी ऑक्सिडेंट्स आणि फायटोन्युट्रएंट्स असतात. ज्यामुळे कॅन्सरचा धोका टाळण्यास मदत होते. 3 / 7वजन कमी करण्यासाठी फुलकोबी फायदेशीर ठरते याचे इतरही अनेक फायदे मिळतात. यात लो कॅलरी आणि हाय फायबर्स असतात. वजन कमी करण्यासाठी मदत होते. यातील फायबर्समुळे क्रेव्हिंग्स कंट्रोल होते ज्यामुळे तुम्हाला ओव्हरइटींग होत नाही. 4 / 7फ्लॉवरच्या सेवनाने शरीराला व्हिटामीन सी आणि व्हिटामीन बी-६ मिळते, यात पोटॅशियम, मॅग्नेशियम यांसारखी पोषक तत्व असतात. शरीरातील पोषक तत्वांबरोबर अनेक आजारांचा धोका कमी होतो. यात एंटीऑक्सिडेंट्स असतात. ज्यामुळे शरीरातील फ्री रॅडिकल्सशी लढण्यास मदत होते. 5 / 7हृदयाच्या चांगल्या आरोग्यासाठी फ्लॉवरचे सेवन फायदेशीर ठरते. कारण यात पोटॅशियम आणि एंटी ऑक्सिडेंट्स असतात. 6 / 7ज्यामुळे हाय ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहते. हार्ट अटॅकचा धोकाही कमी होतो. 7 / 7या भाजीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी होतो. ज्यामुळे ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहण्यास मदत होते. डायबिटीससाठी हे फायदेशीर ठरते. आणखी वाचा Subscribe to Notifications