लवंग आणि तूप एकत्र करून खाण्याचे ५ जादुई फायदे, बघा एवढीशी लवंग काय कमाल करते...
Updated:February 16, 2025 09:20 IST2025-02-16T09:17:07+5:302025-02-16T09:20:02+5:30

आपल्याला माहितीच आहे की लवंग आणि तूप हे दोन्हीही पदार्थ आपल्या आरोग्यासाठी उत्तम असतात. पण ते स्वतंत्रपणे खाण्याऐवजी जर एका विशिष्ट पद्धतीने एकत्र करून खाल्ले तर त्याचा आपल्या आरोग्यावर आणखी चांगला परिणाम होतो..(amazing benefits of eating cloves with ghee)
याविषयी डॉ. गीता श्रॉफ यांनी दिलेली माहिती नवभारत टाईम्सने दिली आहे. यामध्ये त्या सांगतात की लवंग तुपामध्ये थोडी परतून खाण्याचे अनेक फायदे आहेत. सगळ्यात पहिला फायदा म्हणजे सर्दी, खोकला, कफा, घसादुखी असा त्रास कमी होण्यास मदत होते.(health benefits of eating cloves and ghee together)
लवंग आणि तूप एकत्र करून खाणं पचनक्रिया अधिक चांगली होण्यासाठीही खूप फायदेशीर ठरतं.
लवंग आणि तूप एकत्र करून खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा वाढते.
दाढ दुखत असल्यास लवंग थोड्याशा तुपात परतून घ्या आणि ती दुखऱ्या दाढेखाली दाबून धरा. यामुळे दातांचं दुखणं लवकरं बरं होतं. तसेच मुखदुर्गंधी कमी करण्यासाठीही त्याचा फायदा होतो.
लवंग आणि तूप या दोघांमध्ये ॲण्टीइन्फ्लामेटरी घटक आणि ॲण्टीऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होण्यासाठीही त्याची मदत होते.