वजन कमी करताना 5 गोष्टी टाळा...नाहीतर वजन कमी होण्याऐवजी वाढेल झरझर

Published:July 16, 2022 08:07 AM2022-07-16T08:07:04+5:302022-07-16T08:10:02+5:30

वजन कमी करताना 5 गोष्टी टाळा...नाहीतर वजन कमी होण्याऐवजी वाढेल झरझर

१. वजन कमी करणं हे वाटतं तेवढं सोपं काम मुळीच नाही. यासाठी व्यायामाच्या स्वरुपात मेहनत घेण्याची तयारी तर लागतेच शिवाय तुमच्याकडे खूप संयम असणंही गरजेचं असतं. कारण असं एका झटक्यात वजन कमी होत नाही.

वजन कमी करताना 5 गोष्टी टाळा...नाहीतर वजन कमी होण्याऐवजी वाढेल झरझर

२. वजन कमी करण्याच्या प्रक्रियेमध्ये रोजचा व्यायाम तर अतिशय महत्त्वाचा आहेच, पण त्यासोबतच तुमचा आहार कसा आणि किती आहे, यालाही खूप महत्त्व आहे. व्यायाम आणि डाएट आणि त्याच्या जोडीला थोडे पेशन्स असावेच लागतात.

वजन कमी करताना 5 गोष्टी टाळा...नाहीतर वजन कमी होण्याऐवजी वाढेल झरझर

३. पण झटपट वजन कमी करण्याच्या नादात अनेक जणांकडून काही चुका होतात. या चुकांमुळे मग वजन कमी होण्याऐवजी एकतर झरझर वाढू लागतं किंवा मग काही वेगळेच आजार मागे लागतात. त्यामुळे वजन कमी करताना तुम्ही तर या काही चुका करत नाही ना, हे एकदा तपासून बघा.

वजन कमी करताना 5 गोष्टी टाळा...नाहीतर वजन कमी होण्याऐवजी वाढेल झरझर

४. तब्येतीसाठी पुरेशी झोप अतिशय महत्त्वाची आहे. कमी झोपेमुळेही लठ्ठपणा वाढतो. कारण त्यामुळे शरीरातील हार्मोनल संतुलन बिघडते. उर्जा कमी पडते. थकवा जाणवतो. त्यामुळे मग बऱ्याचदा हा थकवा घालविण्यासाठी गरजेपेक्षा जास्त खाल्ल जाते.

वजन कमी करताना 5 गोष्टी टाळा...नाहीतर वजन कमी होण्याऐवजी वाढेल झरझर

५. वजन कमी करण्याच्या नादात गरजेपेक्षा अधिक व्यायाम करायला जाल, तर त्यामुळे अधिक थकवा येईल. मांसपेशी दुखावल्या जातील आणि त्यामुळे अशक्तपणा जाणवू शकतो. एकदम हेवी एक्सरसाईज करून झटक्यात वजन कमी होत नाही. त्यामुळे फिटनेस एक्सपर्टकडून तुमचं वर्कआऊट शेड्यूल ठरवून घ्या आणि त्याच पद्धतीने व्यायाम करा.

वजन कमी करताना 5 गोष्टी टाळा...नाहीतर वजन कमी होण्याऐवजी वाढेल झरझर

६. वजन कमी करण्याच्या नादात डाएटच्या नावाखाली अनेक जणं जेवण अगदीच कमी करून टाकतात. पण डाएट म्हणजे काय ते आधी समजून घ्या. अर्धवट जेवून उपाशी राहण्यापेक्षा जे काही खाल ते सकस, पौष्टिक खा. पॅकेज फूड, जंक फूड खाणं टाळा. तसेच साखर असणारे गोड पदार्थ, तेलकट, अतिखारट खाणंही टाळा.

वजन कमी करताना 5 गोष्टी टाळा...नाहीतर वजन कमी होण्याऐवजी वाढेल झरझर

७. पाणी किती पितोय, याकडे दुर्लक्ष करू नका. भरपूर पाणी प्या. कारण त्यामुळे बाॅडी डिटॉक्स होते आणि त्याचा वेटलॉससाठी निश्चितच उपयोग होतो. योग्य प्रमाणात पाणी प्यायल्यामुळे एनर्जी लेव्हल वाढते, स्नायुंची ताकद वाढते आणि चयापचय क्रियेचा वेग वाढण्यास मदत होते.

वजन कमी करताना 5 गोष्टी टाळा...नाहीतर वजन कमी होण्याऐवजी वाढेल झरझर

८. वेटलॉस प्रवासात अनेकदा दोन जेवणांच्या मधल्या काळात भूक लागू शकते. यावेळीच काहीतरी अबरचबर पोटात जाण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे अशावेळी तुमच्याजवळ एखादं फळ, राजगिरा किंवा शेंगदाण्याची चिक्की, लाह्या असे पदार्थ नक्की असू द्या.