जेवण झाल्यानंतर करा फक्त २ गोष्टी, वजन वाढणार नाही-पोटही सुटणार नाही, आयुर्वेदतज्ज्ञ सांगतात... By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2024 3:46 PM 1 / 6वाढतं वजन किंवा सुटलेलं पोट यामुळे अनेकजण सध्या त्रस्त आहेत. म्हणूनच तुमचा हा त्रास कमी करण्यासाठी दुपारचं आणि रात्रीचं जेवण झाल्यानंतर २ गोष्टी करायला अजिबात विसरू नका... 2 / 6ही दोन कामं नेमकी कोणती आणि ती कशा पद्धतीने करावी, याविषयीचा व्हिडिओ आयुर्वेदिक डॉक्टरांनी chitchatrajlavi या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. 3 / 6यामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की जेवल्यानंतर तुम्ही १० ते १२ मिनिटांसाठी एका जागी शांत बसा. यामुळे तुमचं अन्न पचन क्रियेपुर्वी पोटात स्थिर होण्यासाठी मदत होईल. 4 / 6यानंतर मग तुम्ही शतपावली करा. शतपावली करणे म्हणजे १०० पावलं चालणे. शतपावली कशी करावी, जोरात चालावं की हळू चालावं, असे प्रश्न अनेकांच्या मनात येतात. त्यांचीही उत्तरं डॉक्टरांनी व्हिडिओमध्ये दिली आहेत.5 / 6डॉक्टर सांगतात की शतपावली करताना अजिबात घाई- गडबड करू नका. उलट अतिशय आरामात, सावकाशपणे, रमतगमत, गप्पा मारत शतपावली करा.6 / 6अशा पद्धतीने शतपावली केल्यास अन्नाचे व्यवस्थित पचन होते. त्यामुळे साहजिकच अंगावर चरबी साचण्याचे प्रमाण कमी होऊन वजन आटोक्यात राहते आणि वाढत्या पोटावरही नियंत्रण येते. आणखी वाचा Subscribe to Notifications