benefits of drinking khus or vetiver water in summer, why to drink vala water in summer
उन्हाळ्यात वाळ्याचं पाणी प्या, आहारतज्ज्ञ सांगतात ५ फायदे- उन्हाळ्यातील असह्य त्रासांवर पारंपरिक औषधPublished:May 23, 2024 02:26 PM2024-05-23T14:26:05+5:302024-05-23T15:37:05+5:30Join usJoin usNext उन्हाळ्याचा त्रास सुसह्य करण्यासाठी आपण एसी, कुलर वापरतो. पण यापेक्षाही तुमच्या शरीराला अधिक थंडावा देणारा पदार्थ म्हणजे वाळा..(benefits of drinking khus or vetiver water in summer) वाळा घातलेलं पाणी म्हणजेच वाळ्याचं पाणी (valyavha pani) हा आपल्याकडचा एक पारंपरिक उपाय आहे. पण हल्ली तो आपण विसरून जात आहोत. या वाळ्याचे आपल्या आरोग्यासाठी किती जबरदस्त फायदे होतात, याविषयी माहिती सांगणारा एक व्हिडिओ सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये त्या सांगतात की वाळ्याचं पाणी हे आपल्याकडचं नॅचरल कुलर आहे. शरीर नैसर्गिकपणे थंड करण्यासाठी वाळा अतिशय उपयुक्त असतो. वाळ्यामध्ये असणारे घटक त्वचेचं सौंदर्य खुलविण्यासाठी आणि ॲक्ने, पिंपल्स असा त्रास कमी करण्यासाठी मदत करतात. त्यामुळे वाळ्याचं पाणी त्वचेसाठीही अतिशय गुणकारी आहे. उन्हाळ्यात डोक्यात खूप खाज येते, कोंडा होतो. हा त्रास कमी करण्यासाठीही वाळ्याचं पाणी उपयुक्त ठरतं. त्यामुळे केसांच्या तक्रारी दूर करण्यासाठीही वाळा अतिशय गुणकारी ठरतो. उन्हामुळे बऱ्याचदा डोळे चुरचुरण्याचा त्रास होतो. डोळ्यांची जळजळ होते. वाळ्यामध्ये असणारं झिंक डोळ्यांची आग कमी करतात आणि डोळ्यांना थंडावा देतात. उन्हाळ्यात अनेकांना उन्हाळी लागण्याचा त्रास होतो. म्हणजेच लघवीच्या ठिकाणी जळजळ होते. हा त्रास कमी करण्यासाठीही वाळा घातलेलं पाणी पिणं हा उत्तम उपाय आहे. वाळ्यामध्ये लोह, मँगनीज आणि व्हिटॅमीन बी असतं. यामुळे रक्ताभिसरणाची क्रिया सुरळीत होऊन रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत हाेते. टॅग्स :वेट लॉस टिप्ससमर स्पेशलपाणीहेल्थ टिप्सWeight Loss TipsSummer SpecialWaterHealth Tips