Join us   

सतत अपचनाचा त्रास? आहारतज्ज्ञ सांगतात 'या' पद्धतीने लवंग खा- पचन चांगलं होऊन मिळतील ५ फायदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2024 11:20 AM

1 / 7
लवंग हा आपल्या स्वयंपाक घरातला अतिशय गुणकारी पदार्थ. पण आपण मात्र तो कधीतरीच खातो. सर्दी झाल्यावरच बऱ्याचदा तिची आठवण येते.
2 / 7
पण आपण दररोज योग्य पद्धतीने योग्य प्रमाणात लवंग खाल्ली तर त्यामुळे पचनाशी संबंधित वेगवेगळे त्रास तर कमी होतातच. पण शरीराला इतरही अनेक फायदे मिळतात. ते फायदे नेमके कोणते आणि ते मिळविण्यासाठी नेमक्या कोणत्या पद्धतीने लवंग खावी, याविषयी आहारतज्ज्ञ निखिल वत्स यांनी दिलेली माहिती झी न्यूजने प्रकाशित केलेली आहे.
3 / 7
लवंग खाल्यामुळे पचन क्रियेमध्ये उपयुक्त ठरणाऱ्या एन्झाईम्सची निर्मिती याेग्य प्रमाणात होते. त्यामुळे अपचन, ॲसिडिटी किंवा पचनाशी संबंधित इतर सगळेच त्रास बऱ्याच प्रमाणात कमी होतात.
4 / 7
लवंगमध्ये फायबरचे प्रमाण चांगल्या प्रमाणात असते. त्यामुळे पचनक्रिया आणि त्याच्याशी संबंधित इतर त्रास कमी करण्यासाठी लवंग उपयुक्त ठरते.
5 / 7
लवंगमध्ये व्हिटॅमिन बी १, व्हिटॅमिन सी, के तसेच बीटा कॅरेटिन याेग्य प्रमाणात असते. त्यामुळे त्वचा, केस यांच्या आरोग्यासाठीही लवंग उपयुक्त ठरते.
6 / 7
लवंगमध्ये प्रोटीन्स, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम, झिंक आणि कार्बोहायड्रेट्सही काही प्रमाणात असतात.
7 / 7
दररोज रात्री झोपण्यापुर्वी दोन लवंगा कोमट पाण्यासोबत घेणे, ही लवंग खाण्याची उत्तम पद्धत आहे, असं डॉक्टर सांगतात.
टॅग्स : वेट लॉस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्स