रोज खा सूर्यफुलाच्या १ चमचा बिया, वजन कमी-केस सुंदर-त्वचा चमकेल तेजानं..
Updated:February 6, 2025 14:38 IST2025-02-06T09:20:21+5:302025-02-06T14:38:23+5:30

सूर्यफुलाच्या बिया नियमित खाल्ल्यामुळे अंगावरील सूज म्हणजेच इन्फ्लामेशन कमी होण्यास मदत होते. त्यामुळे आपोआपच त्याचा वेटलॉससाठी फायदा होतो.
सूर्यफुलाच्या बियांमध्ये व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे त्वचा आणि केसांचे आरोग्य उत्तम राहाते.
हेल्दी फॅट्स, मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असल्यामुळे हृदयाच्या आरोग्यासाठीही सूर्यफुलाच्या बिया खाणे फायदेशीर ठरते.
सूर्यफुलाच्या बियांमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि झिंक भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी त्याचा फायदा होतो.
सूर्यफुलाच्या बियांमध्ये मॅग्नेशियम उत्तम प्रमाणात असल्यामुळे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठीही त्या उपयुक्त ठरतात.
व्हिटॅमिन बी भरपूर प्रमाणात असल्यामुळे मेंदूची कार्यक्षमता वाढविण्यासाठी त्यांची मदत होते.
कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात मिळत असल्याने हाडं बळकट होण्यासाठी त्या उपयुक्त ठरतात.