1 / 7सूर्यफुलाच्या बिया नियमित खाल्ल्यामुळे अंगावरील सूज म्हणजेच इन्फ्लामेशन कमी होण्यास मदत होते. त्यामुळे आपोआपच त्याचा वेटलॉससाठी फायदा होतो.2 / 7सूर्यफुलाच्या बियांमध्ये व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे त्वचा आणि केसांचे आरोग्य उत्तम राहाते.3 / 7हेल्दी फॅट्स, मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असल्यामुळे हृदयाच्या आरोग्यासाठीही सूर्यफुलाच्या बिया खाणे फायदेशीर ठरते.4 / 7सूर्यफुलाच्या बियांमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि झिंक भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी त्याचा फायदा होतो.5 / 7सूर्यफुलाच्या बियांमध्ये मॅग्नेशियम उत्तम प्रमाणात असल्यामुळे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठीही त्या उपयुक्त ठरतात. 6 / 7 व्हिटॅमिन बी भरपूर प्रमाणात असल्यामुळे मेंदूची कार्यक्षमता वाढविण्यासाठी त्यांची मदत होते.7 / 7 कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात मिळत असल्याने हाडं बळकट होण्यासाठी त्या उपयुक्त ठरतात.