उपवासाच्या दिवसांत रताळी खायला विसरू नका, ५ जबरदस्त फायदे, तब्येतही सांभाळली जाईल- उपवासही होईल By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2023 3:52 PM 1 / 6आपल्याला फक्त उपवासाच्या दिवशीच रताळ्याची आठवण येते. पण उपवासाव्यतिरिक्त अन्य वेळीही रताळे खाणे शरीरासाठी खूप फायद्याचे आहे. रताळे खाल्ल्याने शरीराला नेमके कोणते फायदे होतात, ते आता पाहूया....2 / 6उकडलेल्या रताळ्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी ते उपयुक्त असतात. त्यामुळे मधुमेह असणाऱ्यांनाही उकडलेली रताळी चालतात.3 / 6रताळ्यांमध्ये ॲण्टीऑक्सिडंट्स भरपूर असतात. त्यामुळे हृदयविकार आणि कर्करोग यांचा धोका कमी करण्यासाठी रताळे खाणे फायदेशीर ठरते.4 / 6रताळ्यांमध्ये फायबरचे प्रमाण चांगले असल्याने वेटलॉससाठीही ते उपयुक्त ठरतात. रताळी खाल्ल्याने बराच वेळ पोट भरल्यासारखे राहते. त्यामुळे पुढे काही तास काही खाण्याची इच्छा होत नाही.5 / 6रताळ्यांमध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे डोळ्यांसाठी ते चांगले आहेत. म्हणूनच लहान मुलांनाही आवर्जून रताळी खायला द्यायला पाहिजेत. 6 / 6उपवासादरम्यान अनेकांना अपचन, कॉन्स्टिपेशन, ॲसिडीटी असा त्रास होतो. अशा लोकांनी उपवास काळात एकदा तरी रताळी खायलाच पाहिजेत. आणखी वाचा Subscribe to Notifications