Deficiency of Vitamin B12, Best food and fruits for vitamin B12
व्हिटॅमिन बी १२ खूपच कमी झालं आहे? ५ फळं नियमित खा, आहारतज्ज्ञ सांगतात, व्हिटॅमिन बी १२ कमी असेल तर..Published:August 4, 2023 05:07 PM2023-08-04T17:07:28+5:302023-08-04T17:16:27+5:30Join usJoin usNext व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता (Deficiency of Vitamin B12) अनेक जणांमध्ये दिसून येते. यामुळे मग अशक्तपणा येणे, सतत थकवा जाणवणे, कधीच उत्साही नसणे अशा समस्या तर जाणवतातच. पण आरोग्याच्या इतर अनेक तक्रारीही डाेके वर काढतात. व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता असेल, तर त्याचा परिणाम मानसिक आरोग्यावरही जाणवू लागतो. त्यामुळे तुम्हालाही आरोग्याच्या अशा तक्रारी जाणवत असतील किंवा शरीरात व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता असेल तर त्यासाठी कोणती फळे प्रामुख्याने खायला पाहिजेत, याविषयी आहारतज्ज्ञ शिखा अग्रवाल शर्मा यांनी नवभारतटाइम्स.कॉम यांना ही माहिती दिली आहे. व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेतलाच पाहिजे. पण त्यासोबतच आहारात ही काही फळे (food and fruits for vitamin B12) सामाविष्ट करायला हरकत नाही. पेरू या फळातूनही काही प्रमाणात व्हिटॅमिन बी १२ मिळते. त्यासाेबतच त्यातून व्हिटॅमिन सी, ए, के, फॉलिक ॲसिड, फायबर हे देखील भरपूर प्रमाणात मिळते. आंबेही शरीराला व्हिटमिन बी १२ चा पुरवठा करतात. तसेच व्हिटॅमिन सी, ए, पोटॅशियम यांचा उत्तम स्त्रोत म्हणून या फळांच्या राजाकडे पाहिले जाते. आरोग्यासाठी पोषक असणारे सफरचंदही शरीराला काही प्रमाणात व्हिटॅमिन बी १२ चा पुरवठा करते. नारळपाणी प्यायल्याने किंवा नारळ खाल्ल्यानेही शरीराला व्हिटॅमिन बी १२ मिळते. याशिवाय नारळातून मोठ्या प्रमाणावर मॅग्नेशियम, कॅल्शियम, फायबर मिळते. आंबटगोड चवीची संत्री व्हिटॅमिन बी १२ चा उत्तम स्त्रोत मानली जाते. स्वस्तात मस्त फळ म्हणजे केळी. केळीतून जसे मॅग्नेशियम, पोटॅशियम भरपूर प्रमाणात मिळते, तसेच त्यातून व्हिटॅमिन बी १२ आणि व्हिटॅमिन बी ६ चा लाभही होतो. टॅग्स :वेट लॉस टिप्सहेल्थ टिप्सअन्नफळेआहार योजनाWeight Loss TipsHealth TipsfoodfruitsHealthy Diet Plan