Join us   

डाएटिशियन सांगतात नाश्त्यामध्ये ४ पदार्थ मुळीच खाऊ नये- वजन आणि शुगर भराभर वाढेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2024 3:59 PM

1 / 6
वजन वाढू नये किंवा वाढलेलं वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असाल तर नाश्त्यामध्ये कोणते पदार्थ मुळीच खाऊ नयेत, याविषयीची ही माहिती एकदा जाणून घेणं प्रत्येकासाठीच गरजेचं आहे. (Don’t include these foods for breakfast)
2 / 6
ते पदार्थ नेमके कोणते हे सांगणारा व्हिडिओ आहारतज्ज्ञांनी fries.to.fit या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी जे पदार्थ सांगितले आहेत, त्यामुळे वजन वाढण्याचा धोका तर आहेच, पण रक्तातील साखरेचे प्रमाणही वाढू शकते, असं त्या सांगतात. (food items that causes sugar spike and weight gain)
3 / 6
यापैकी पहिला पदार्थ आहे फळं, फळांचे रस किंवा स्मूदी. जर तुम्ही हे पदार्थ सकाळी नाश्त्यामध्ये घेतले तर रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. शिवाय त्यातून फायबर अजिबात मिळत नाहीत, त्यामुळे पुरेशी भूक भागली जात नाही आणि वारंवार काहीतरी खाण्याची इच्छा होते.
4 / 6
दुसरं आहे चहा किंवा कॉफी. नाश्ता झाल्यानंतर लगेचच चहा किंवा कॉफी घेण्याची सवय अनेकांना असते. यामुळे नाश्त्यातून तुम्ही जे पोषक पदार्थ खाल्ले आहेत, ते शरीरात शोषून घेण्यास चहा- कॉफीमध्ये असणारे टॅनिन अडथळा निर्माण करते.
5 / 6
कोणत्याही प्रकारचं फ्लेवर्ड योगर्ट खाणेही टत्तळावे. कारण त्यातून अतिरिक्त साखर भरपूर प्रमाणात पोटात जाते.
6 / 6
गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, मका, ओट्स अशा प्रकारच्या धान्यांपासून तयार झालेले पदार्थही नाश्त्यामध्ये घेणं टाळावं. कारण त्यांच्यामध्ये प्रोटीन्स, फायबर आणि फॅट्स कमी प्रमाणात असतात. त्यामुळे वारंवार भूक लागल्यासारखं होतं.
टॅग्स : वेट लॉस टिप्सअन्नमधुमेह