डाळिंब खाऊन सालं फेकून देऊ नका; डाळिंबाच्या सालींचे ८ जबरदस्त फायदे, अत्यंत आरोग्यदायी उपयोग By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2022 2:49 PM 1 / 11१. डाळिंबाचे लालचुटूक गोड दाणे खाऊन आपण त्याची सालपटं हमखास फेकून देताेच. कारण त्या सालीही आरोग्यासाठी गुणकारी असतात, हे आपल्याला माहितीच नसतं. 2 / 11२. पण डाळिंबाएवढेच पौष्टिक गुण त्याच्या सालींमध्येही असतात. अगदी आरोग्यापासून ते सौंदर्यापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी डाळिंबाच्या सालींचा उपयोग होतो. म्हणूनच त्यांचे नेमके उपयोग काय आणि डाळिंबाच्या साली वापरायच्या कशा याविषयी बघूया.3 / 11३. बॉडी डिटॉक्स करण्यासाठी डाळिंबाच्या सालींचा उपयोग होतो. एका अभ्यासानुसार असे सांगण्यात आले आहे की शरीरातून टॉक्झिन्स म्हणजेच विषारी द्रव्ये बाहेर काढून टाकण्यासाठी डाळिंबाच्या सालींमधले गुणधर्म अतिशय उपयुक्त ठरतात.4 / 11४. त्वचेतील कॉलॅजीन ब्रेकडाऊन होऊ नये, यासाठीही डाळिंबाच्या साली उपयोगी ठरतात. त्यामुळे त्वचा अधिक काळ तरुण, तजेलदार राहण्यास मदत होते.5 / 11५. शिवाय त्वचेवरील पिंपल्सचे डाग, ॲक्ने, पुरळं कमी करण्यासाठीही डाळिंबाच्या सालींचा उपयोग होतो. 6 / 11६. हृदयरोग आणि मधुमेह असणाऱ्यांसाठीही डाळिंबाच्या सालींची पावडर उपयोगी ठरते. शिवाय त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ॲण्टीऑक्सिडंट्स असतात.7 / 11७. डोक्यातला कोंडा कमी करण्यासाठी आणि केसांचं गळणं थांबविण्यासाठी डाळिंबाच्या सालींची पावडर उपयोगी ठरते. ही पावडर तेलामध्ये टाका आणि त्याने डोक्याला मालिश करा. साधारण २ तासांनी नेहमीप्रमाणे शाम्पू करून केस धुवून टाका.8 / 11८. घशात खवखव होत असेल, घसा खूप दुखत असेल तर डाळिंबाच्या सालींची पावडर गरम पाण्यात टाकून त्याने गुळण्या करा. घशाला आराम मिळेल. कारण त्यात ॲण्टीबॅक्टेरियल घटक मोठ्या प्रमाणात असतात. 9 / 11९. डाळिंबाच्या दाण्यांपेक्षाही त्याच्या सालींमध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणावर असते.10 / 11१०. वारंवार तोंड येण्याचा त्रास असेल तर डाळिंबाच्या सालींच्या पावडरीने गुळण्या करा. त्यातील ॲण्टी फंगल आणि ॲण्टीमायक्रोबियल गुणधर्म तोंडातील फोड, जखमा बऱ्या करण्यासाठी गुणकारी ठरतात. 11 / 11११. डाळिंबाच्या सालींची पावडर करण्यासाठी सालं कडक उन्हात २ ते ३ दिवस वाळवून घ्या. त्यानंतर मिक्सरमध्ये वाटून त्याची बारीक पावडर करून घ्या. आणखी वाचा Subscribe to Notifications