1 / 7मराठमोळी अभिनेत्री अमृता खनविलकर हिने तिचा फिटनेस मंत्र नुकताच तिच्या चाहत्यांसोबत सोशल मिडियावर शेअर केला आहे. 2 / 7यामध्ये अमृताने ती वेटलॉससाठी तसेच फिटनेससाठी दररोज खाण्यापिण्याची कोणती पथ्ये पाळते, याविषयीची माहिती दिली आहे. 3 / 7यामध्ये अमृताने सांगितलेली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ती दररोज ३ ते ४ लीटर पाणी पिते. यामुळे आरोग्याला खूप आश्चर्यकारक फायदे होतात, असं ती सांगते.4 / 7दुसरं म्हणजे ती दररोज ग्रीन ज्यूस घेते. यामध्ये काकडी, सेलेरी, पालक, ग्रीन ॲपल, आलं असं सगळं टाकलेलं असतं. सगळ्यात आधी पालक थोडा उकळून घ्यायचा. आणि त्यानंतर बाकीचे पदार्थ घालून त्याचा ज्सूस करायचा. 5 / 7जेवणानंतर ती बडिशेप आणि जिरे घालून उकळलेलं पाणी पिते. यामुळे पचनाला मदत होऊन वजन कमी होण्यास फायदा होतो. हे पाणी पिऊन तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात केली तरी चालेल, असंही ती म्हणते आहे.6 / 7रोज सकाळी उठल्यानंतर अमृता ब्लॅक कॉफीमध्ये तूप टाकून घेते. ती म्हणते की गुड फॅट्सने तुमच्या दिवसाची सुरुवात झाली तर ते आरोग्यासाठी चांगलेच असते. यानंतर दिवसातून दोन वेळा ती ब्लॅक कॉफी घेते. कारण ब्लॅक कॉफीमध्ये भरपूर ॲण्टीऑक्सिडंट्स असतात. 7 / 7प्रत्येकाला खाण्यापिण्यात काय सहन होईल, याचे प्रमाण वेगवेगळे असतात. त्यामुळे वेगवेगळ्या गोष्टी करून पाहा, पण शरीराला जे झेपेल तेच करा. कोणतीही गोष्ट खूप जास्त करू नका. आणि आरोग्यासाठी जे काही कराल ते एन्जॉय करा.. असा सल्लाही अमृताने दिला आहे.