Join us   

ओटी पोट सुटलंय-कपडे घट्ट होतात? जेवणात ५ पदार्थांचे एकत्र-एकावेळी खा, झरझर घटेल चरबी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2023 8:47 AM

1 / 7
वजन कमी करण्यासाठी आणि शरीर कायम हेल्दी ठेवण्यासाठी क्विवक ट्रिटमेंट हे हेल्दी सोल्यूशन नाही. हेल्दी लाईफस्टाईल फॉलो करून तुम्ही कमीत कमी वेळात वजन कमी करू शकता. रोजच्या जेवणात काही पदार्थांचा समावेश करा. ज्यात पोषक तत्वांचे कॉम्बिनेशन असेल. यामुळे पचनक्रिया सुधारून फॅट बर्न होण्यास मदत होईल. (Food Combinations For Weight Loss)
2 / 7
वजन कमी करण्यासाठी लाईफस्टाईल बदलणं फार महत्वाचं आहे. व्यायाम, लाईफस्टाईल या उपायांचा आहारात समावेश करा. वजन कमी करण्यासाठी काय खायचं, काय टाळायचं ते समजून घेऊया. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगळी असते पण काही फूड कॉम्बिनेशन्स वजन कमी करण्यात फायदेशीर ठरू शकतात. (Five Effective food combinations for weight loss)
3 / 7
डाळी आणि नट्समध्ये प्रोटीन्स शिवाय फायबर्स असतात. ज्यामुळे मेटाबॉलिझ्म चांगला राहतो. हाय फायबर कंटेटमुळे दीर्घकाळ पोट भरल्यासारखं वाटतं.
4 / 7
जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल उकडलेल्या भाज्या आणि पनीरच आहारात समावेश करा. यातील प्रोटीन्स आणि पोषक तत्वाांमुळे शरीर निरोगी आणि ठणठणीत राहण्यास मदत होते.
5 / 7
प्रोटिन्सनी परिपूर्ण दही वजन कमी करण्यास फायदेशीर ठरतं. यातील प्रोटीन्स कॅलरीज लवकर बर्न करते. दह्यात ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी आणि एंटी ऑक्सिडेंट्स असतात.
6 / 7
शिमला मिरची, ब्रोकोली या भाज्या प्रोटीन्सचा उत्तम स्त्रोत आहेत. यात व्हिटामीन सी असते. हे कॉम्बिनेशन वजन कमी करण्यात फायदेशीर ठरते.
7 / 7
सफरचंद आणि पिनट बटरमध्ये पोषक तत्व असतात. हे पोषक तत्वांचे उत्तम कॉम्बिनेशन आहे. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. सफरचंद लो कॅलरीजयुक्त असते. यात फायबर्स भरपूर प्रमाणात असतात.
टॅग्स : हेल्थ टिप्सवेट लॉस टिप्स