कॅल्शियम हवंय पण दूध आवडत नाही ? ५ पदार्थ रोज खा, पोलादी शरीर-मजबूत होतील हाडं Published:May 28, 2024 12:22 PM 2024-05-28T12:22:29+5:30 2024-05-28T14:12:08+5:30
Foods For Calcium Apart From Milk : बदामाचा आपल्या आहारात समावेश करा. बदामात कॅल्शियमशिवाय इतरही पोषक तत्व जसं की प्रोटीन, फायबर्स, मॅग्नेशियम, मॅन्गनीज असते. हाडांना मजबूत बनवण्यासाठी डेअरी प्रोडक्ट्सचा वापर अनेकजण करतात. कॅल्शियम हाडांना मजबूत बनवण्यासाठी फायदेशीर ठरते. रोजच्या आहारात काही पदार्थांचा समावेश नियमित केला तर तुम्ही कॅल्शियमची कमतरता भरून काढू शदतात. प्रसिद्ध आहारातज्ज्ञ निखिल वस्त यांनी काही पदार्थांबाबत सांगितले आहे ज्यांचा आहारात समावेश केल्यास भरपूर फायदे मिळतील. ब्रोकोली या हिरव्या भाजीत एंटीऑक्सिडेंट्स, फायबर्स, एंटी इंफ्लेमेटरी गुण असतात.
टोफू कॅल्शियमसाठी उत्तम आहे. आहारात टोफूचा समावेश केल्यास फायटोएस्ट्रोजनसारखे आयसोफ्लेवोन् असतात. एलडीएल कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. ज्यामुळे लठ्ठपणा, हार्ट अटॅक यांसारख्या समस्या दूर होण्यास मदत होते.
डाळी आणि शेंगांमध्ये भरपूर कॅल्शियम असते. कॅल्शियम प्रोटीन्सशिवाय इतर पोषक तत्वही त्यात असतात. आहारात डाळींचा समावेश केल्यास त्यातील पोषक तत्व मिळतात आणि ओव्हरऑल हेल्थ चांगली राहण्यास मदत होते.
बदामाचा आपल्या आहारात समावेश करा. बदामात कॅल्शियमशिवाय इतरही पोषक तत्व जसं की प्रोटीन, फायबर्स, मॅग्नेशियम, मॅन्गनीज असते. ज्यामुळे शरीराबरोबरच हाड चांगली राहण्यासही मदत होते. रात्री भिजवून सकाळी या बदामांचे सेवन केल्यास शरीराला भरपूर फायदे मिळतील
सोयाबीन
सोयाबीन खायला भरपूर लोकांना आवडते. सोयाबीनमध्ये मोठया प्रमाणात कॅल्शियम असते. हाडांसाठी फायदेशीर ठरते. कॅल्शियम, सोयाबीन, सोया चंक्सचा आफल्या आहारात समावेश करू शकता.