Join us   

रोज रात्रीच्या जेवणात ४ पदार्थ खा; झरझर कमी होईल वजन, मेंटेन राहाल-फिट दिसाल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 5:53 PM

1 / 6
जितकं महत्व आपण सकाळच्या खाण्यापिण्याला देतो तितकंच खाण्यापिण्याच्या वेळेलाही तितकंच महत्व द्यायला हवं. रात्रीच्या वेळी आपण जे काही खातो याचा परिणाम वजनावर होतो. रात्रीच्यावेळी हलक्या, पौष्टीक पदार्थांचा आहारात समावेश करायला हवा. वजन कमी झाल्यानंतर याचा परिणाम दिसून येतो. (Foods To Eat At Night For Weight Loss)
2 / 6
गरजेपेक्षा जास्त खाणं, चटपटीत, तेलकट आणि फॅट्सयुक्त खाण्याचा शरीरावर चुकीचा परिणाम होतो. रात्रीच्यावेळी योग्य डाएटची निवड करणं फार महत्वाचे असते. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींचा फॅट बर्निंगवर परिणाम होतो आणि वजन कमी करण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होतो.
3 / 6
रात्रीच्यावेळी ओट्स इडली खाऊ शकता. यामुळे शरीराला हाय प्रोटीन आणि लो कार्ब्स मिळतात. ओट्स इडली खाल्ल्याने वजन कमी होईल आणि याची चवही उत्तम लागेल. चटणी किंवा सांभार किंवा ओट्सबरोबर तुम्ही खाऊ शकता.
4 / 6
वजन कमी करण्यासाठी कोकोनट राईस हा उत्तम पर्याय आहेत. हा भात चविष्ट असतो. हा भात वेट लॉस फ्रेंडली असतो आणि हा भात बनवणं खूपच सोपं असतं. कोकोनट राईस शेंगदाणे, नारळ, काजू आणि मोहोरीचे दाणे घालू शकता.
5 / 6
रात्रीच्या जेवणात उपमा खाऊ शकता. उपम्यात मटार घालून खाल्ल्याने एंटी ऑक्सिडेंट्स, व्हिटामीनस के, सी, फॉलेट, प्रोटीन्स, मॅग्नीज आणि फायबर्स असतात. मटार उपम्यात गाजरात मिरची, कोथिंबीर, कांदा घालू शकतो.
6 / 6
ओट्समध्ये केवळ फायबरच नाही तर ते शरीराला उच्च प्रथिने देखील प्रदान करते. ओट्स खिचडीमध्ये मूग डाळ, ओट्स, मटार, टोमॅटो, ऑलिव्ह ऑइल आणि मूग डाळ देखील घालता येते.
टॅग्स : वेट लॉस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्सफिटनेस टिप्स