दिवसाची सुरुवात चहा- कॉफीने नकोच, त्याऐवजी ३ पदार्थ खा.. तब्येतीच्या अनेक तक्रारींवर रामबाण उपाय By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2023 12:32 PM 1 / 7१. दिवस उजाडला, डोळे उघडले की ब्रश करताच आपल्याला गरमागरम चहा किंवा कॉफी पाहिजे असते. सकाळच्या वेळी या गोष्टी मनानुसार मिळाल्या नाहीत, तर संपूर्ण दिवसच खराब होतो. पण दिवसाची सुरुवात असं चहा- कॉफी पिऊन करू नका, असा सल्ला प्रसिद्ध सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी दिला आहे. 2 / 7२. अनेक जणांना तब्येतीच्या काही तक्रारी असतात. कुणाला हेल्दी वेटलॉस करायचा असतो. कुणाला सतता येणारा थकवा- अशक्तपणा घालवायचा असतो. कुणाला मासिक पाळीचा त्रास असतो. असे सगळे त्रास कमी करण्यासाठी ऋजुता यांनी सांगितलेले उपाय निश्चितच फायदेशीर ठरणारे आहेत. 3 / 7३. कोणते ३ पदार्थ खाऊन दिवसाची सुरुवात केली पाहिजे, याविषयीचा एक व्हिडिओ ऋजुता यांनी नुकताच सोशल मिडियावर शेअर केला आहे. त्या म्हणतात की सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी १ ग्लास पाणी प्या. त्या पाण्यात इतर काहीही टाकण्याची गरज नाही. नुसतं प्लेन पाणी प्या. त्यानंतर केळी, भिजवलेले बदाम किंवा भिजवलेल्या काळ्या मनुका या ३ पैकी कोणताही एक पदार्थ खाऊन दिवसाची सुरुवात करा. 4 / 7४. या तिघांपैकी कोणता पदार्थ कुणी खावा, याविषयीही त्यांनी माहिती दिली आहे. त्या म्हणतात की ज्यांना पचनाचा त्रास आहे, पोटात कायम गॅस झाल्यासारखं वाटतं, कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो किंवा जेवल्यानंतर कायम काहीतरी गोड खावंसं वाटतं त्यांनी केळी खाऊन दिवसाची सुरुवात करावी. केळ आवडत नसेल तर कोणतंही स्थानिक हंगामी फळ खा.5 / 7५. ज्यांना मधुमेह आहे, ज्यांना दिवसभर स्क्रिनवर काम करावं लागतं, डोळे थकल्यासारखे वाटतात किंवा त्वचेचा पोत खराब झाल्यासारखा वाटतो, त्यांनी रात्रभर पाण्यात भिजवलेले ३ ते ४ बदाम खाऊन दिवसाची सुरुवात करावी. खाण्यापुर्वी बदामाची साले काढावीत.6 / 7६. ज्यांचं हिमोग्लोबिन कमी आहे, गॅसेस- ॲसिडीटीचा त्रास आहे, मूड स्विंग्स होतात अशा लोकांनी रात्रभर पाण्यात भिजवलेल्या ४ ते ५ काळ्या मनुका खाव्या. मनुका भिजवलेलं पाणी प्यायलं तरी चालेल. हा प्रयोग २ ते ३ महिने नियमित करून बघितल्यास तब्येतीत खूप चांगला परिणाम दिसून येईल, असं ऋजुता म्हणतात. 7 / 7७. झोपेतून उठल्यानंतर २० मिनिटांच्या आत हे पदार्थ खा. त्यानंतर १५ ते २० मिनिटांनी चहा- कॉफी घेतली तरी चालेल. आणखी वाचा Subscribe to Notifications