रोज सकाळी उपाशीपोटी भिजवलेले बेदाणे खा, ४ प्रकारचे आजार कधीच होणार नाहीत
Updated:January 28, 2025 22:30 IST2025-01-28T17:04:15+5:302025-01-28T22:30:21+5:30

दररोज रात्री झोपण्यापुर्वी ८ ते १० बेदाणे एकदा धुवून घ्या आणि नंतर पाण्यामध्ये भिजत घाला. दुसऱ्यादिवशी सकाळी उठल्यानंतर रिकाम्यापोटी त्या खा. यामुळे तब्येतीला खूप फायदे होतात आणि काही आजारांपासून आपण कायम दूर राहू शकतो असं तज्ज्ञ सांगत आहेत.
दररोज सकाळी नियमितपणे भिजवलेले बेदाणे खाल्ल्यास आरोग्याला काय लाभ होऊ शकतात, याविषयीची माहिती तज्ज्ञांनी go__diet या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.
यामध्ये ते सांगतात की भिजवलेले बेदाणे नियमितपणे खाल्ल्यामुळे ॲनिमिया होत नाही. कारण त्यांच्यात भरपूर प्रमाणात लोह असते. त्यातून दिवसभर पुरेल एवढी एनर्जी मिळते.
बेदाण्यांमध्ये पोटॅशियम चांगल्या प्रमाणात असते. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी त्याचा उपयोग होतो. म्हणूनच नियमितपणे खाल्ल्यास उच्च रक्तदाबाचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतो.
बेदाण्यांमध्ये झिंक आणि मॅग्नेशियम असते. त्यामुळे हार्मोन्स असंतुलनाचा त्रास होत नाही.
बेदाण्यांमधून भरपूर प्रमाणात फायबर मिळते. त्यामुळे पचनक्रिया चांगली होऊन ॲसिडीटी, अपचन, बद्धकोष्ठता असे त्रास होत नाहीत.