Join us

टरबूज खाऊन बिया टाकून देऊ नका! अतिशय गुणकारी असलेल्या टरबूज बियांचे वाचा ५ फायदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2025 09:15 IST

1 / 7
उन्हाळा सुरू झाला की घरोघरी टरबूज आणले जातात. पण काही घरांमध्ये टरबूज त्याच्या बियांसकट खाल्ले जाते तर काही घरांमध्ये त्या काढून टाकल्या जातात.
2 / 7
तुम्हीही टरबुजाच्या बिया काढून टाकत असाल तर थोडं थांबा. कारण टरबुजाएवढ्याच त्याच्या बियाही पौष्टिक असतात.
3 / 7
युनिव्हर्सिटी हॉस्पिटल यांनी केलेल्या अभ्यासानुसार टरबूज बियांमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असते.
4 / 7
टरबूज बियांमधून लोह देखील चांगल्या प्रमाणात मिळते. त्यामुळे ज्यांचे हिमोग्लोबिन कमी असते त्यांनी टरबूज बिया नियमितपणे खाव्या.
5 / 7
टरबूज बियांमध्ये हृदयासाठी उत्तम असणारे हेल्दी फॅट्सदेखील चांगल्या प्रमाणात असतात.
6 / 7
हाडांच्या आरोग्यासाठी चांगले असणारे झिंकदेखील टरबूज बियांमधून मिळते.
7 / 7
टरबूज बियांना मॅग्नेशियमचाही उत्तम स्त्रोत मानला जातो.
टॅग्स : वेट लॉस टिप्सफळेसमर स्पेशलआरोग्यहृदयरोग