फक्त आयुर्वेदातच नाही तर ग्रीक संस्कृतीतही अंजीरला म्हणतात 'सुपरफ्रुट', बघा अंजीर खाण्याचे ५ फायदे By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2024 4:24 PM 1 / 8ग्रीस किंवा ग्रीक संस्कृती ही प्राचीन संस्कृतींपैकी एक म्हणून ओळखली जाते. या संस्कृतीमध्ये सुकामेव्यापैकी एक असणाऱ्या अंजीराचे अतिशय महत्त्व सांगितले आहे. आयुर्वेदानुसारही अंजीर अतिशय आरोग्यदायी आहे.2 / 8अंजीर खाण्याने नेमके काय फायदे होतात, ते कशा पद्धतीने आणि दररोज किती प्रमाणात खाल्ले पाहिजेत, याविषयीची बघा सविस्तर माहिती... ही माहिती आयुर्वेदतज्ज्ञांनी drvaralakshmi या इन्स्टाग्राम पेजवर सांगितली आहे.3 / 8यामध्ये असं सांगितलं आहे की कोणला अपचन, कॉन्स्टीपेशन असा त्रास होत असेल तर तो कमी करण्याचा सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे अंजीर खाणे.4 / 8अंजीर नियमितपणे खाल्ल्यास त्वचा आणि केसांचेही सौंदर्य वाढते. त्यामध्ये लोह, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते.5 / 8अंजीर नियमितपणे खाल्ल्याने लैंगिक आरोग्य सुधारते. 6 / 8अंजीरामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम भरपूर प्रमाणात असल्याने हाडांना बळकटी मिळते. त्यामुळे कधी एखादे हाड फ्रॅक्चर झालेच तर अंजीर खायला पाहिजेत.7 / 8अंजीर नियमितपणे खाल्ल्यास थकवा येत नाही. एनर्जी टिकून राहण्यास मदत होते. संपूर्ण दिवस आनंदी, उत्साही वाटते. 8 / 8सुकं अंजीर खाण्यापेक्षा ते रात्रभर पाण्यात भिजवा आणि सकाळी खा. यामुळे ते पचायलाही सोपं जातं आणि त्याचे शरीराला फायदेही जास्त मिळतात आणखी वाचा Subscribe to Notifications