Join us   

200 किलो वजनाच्या कोरोओग्राफरनं ९८ किलो घटवलं; डाएटमध्ये 'हे' ५ बदल करून मेंटेन केलंं

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 9:07 AM

1 / 8
बॉलिवडूचे प्रसिद्ध कोरियोग्राफर गणेश आचार्य (BollyWood Choreographer Ganesh Acharya) आपल्या डान्समुळेच नाही वजनामुळेही कामय चर्चेत असतात. त्यांचे वजन एकेकाळी २०० किलो इतकं होतं. त्यांनी मेहनत आणि डाएट करून आपलं वजन जवळपास ९८ किलोंनी घटवलं.(Choreographer Ganesh Acharya Lost 98 Kgs All About His Transformation Journey)
2 / 8
गणेश सध्या त्यांच्या वेट लॉस जर्नाीमुळे चर्चेत आहेत. हेल्दी आणि फिट शरीरयष्टी कशी मिळवली याबाबत त्यांनी एका व्हिडिओत स्वत: माहिती दिली आहे. आधी त्याचे शरीर खूपच लठ्ठ होते.
3 / 8
ते सांगतात की त्यांचे वर्कआऊट सेशन खूपच कठीण असायचे. स्विमिंग शिकण्यासाठी जवळपास १५ दिवस लागले. ट्रेनरने त्यांना क्रंचेच करायला शिकवले. गणेश रोज ७५ मिनिटं जवळपास ११ व्यायाम करायचे.
4 / 8
आपल्या डाएटबद्दल सांगताना गणेश म्हणाले की डाएटवर लक्ष देण्याची फार गरज असते. दिवसा १२ वाजताच्या आधी आणि रात्री ८ च्या नंतर काही खाऊ नका.
5 / 8
सकाळी जिममध्ये व्यायाम करून आल्यानंतर १ किंवा २ फळं खायचे यात पपई आणि इतर फळांचा समावेश होता. सकाळी खूपच हलका आहार ते घेत होते.
6 / 8
व्यायाम केल्यानंतर सकाळी ८ नंतर लिक्विड डाएटवर राहत होते. यादरम्यान ते कोणतीच फळं खात नव्हते. पाणी आणि इतर लिक्विड्स पदार्थांचे सेवन करत होते.
7 / 8
१२ वाजेपर्यंत जास्तच भूक लागली तर लिक्वीड डाएट करत असतं. ज्यात सूप, ग्रीन, टी, पाणी याचा समावेश होता. याशिवाय जास्त त्रास झाला की एक चॉकलेट खात होते.
8 / 8
१२ ते ८ दरम्यान ते सगळे पदार्थ अगदी पोटभर खायचे. यात मांसाहार, गोड पदार्थ, नेहमीचे जेवण या सगळ्याचा समावेश असायचा.
टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यफिटनेस टिप्सवेट लॉस टिप्स