How many almonds should you eat in a day, what is the proper time for eating badam?
२-५ की १०? दररोज किती बदाम खाणं तब्येतीसाठी चांगलं? नेमके कधी खावे? वाचा तज्ज्ञांचा सल्लाPublished:February 11, 2024 09:08 AM2024-02-11T09:08:32+5:302024-02-12T16:10:51+5:30Join usJoin usNext बदाम खाणं आरोग्यासाठी चांगलं असतं हे तर आपण जाणतोच. बदामातून शरीराला अनेक पौष्टिक घटक मिळतात. हृदयाच्या आरोग्यासाठी जसे बदाम चांगले असतात, तसेच ते केसांसाठी, त्वचेसाठीही वरदान ठरतात. त्यामुळे काही जण नियमितपणे बदाम खातात. पण दररोज किती बदाम खावेत, याविषयी अनेकांच्या मनात संभ्रम असतोच. काही जणांना वाटते की दिवसाला २ बदाम खाणं योग्य तर काहींना वाटतं दिवसाला १० खाणं चांगलं. म्हणूनच एका दिवशी एका व्यक्तीने किती बदाम खाणं चांगलं आणि बदाम खाण्याची योग्य वेळ कोणती याविषयी तज्ज्ञांकडून जाणून घेऊ. आहारतज्ज्ञ रितिका समद्दर यांनी दिलेली माहिती india.com यांनी प्रकाशित केली आहे. त्यानुसार आहारतज्ज्ञ असं सांगत आहेत की प्रौढ व्यक्तींनी दर दिवशी २० ते २५ बदाम खाणं आरोग्यासाठी चांगलं असतं. तर लहान मुलांसाठी हे प्रमाण १० बदामपेक्षा जास्त नसावं. बदाम पचविण्याची प्रत्येकाची ताकद वेगवेगळी आहे. त्यामुळे आपल्या तब्येतीनुसार आपल्या जवळच्या आहारतज्ज्ञांचा सल्ला घेऊन जेवढे झेपतील, तेवढेच बदाम खावेत. सकाळची वेळ बदाम खाण्यासाठी योग्य आहे. पण दोन जेवणांच्या मधल्या काळात, तसेच सायंकाळीही तुम्ही बदाम खाऊ शकता. टॅग्स :वेट लॉस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्सअन्नWeight Loss TipsHealthHealth Tipsfood