झटपट वजन कमी करायचं? मग दुपारच्या जेवणात तुमच्या ताटात 'हे' पदार्थ असायलाच पाहिजेत By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2024 5:38 PM 1 / 8वजन कमी करायचं असेल तर २ गोष्टींवर तुमचा सगळ्यात जास्त फोकस पाहिजे. त्यामधली पहिली गोष्ट म्हणजे व्यायाम आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा आहार. (how should plan your lunch for fast weight loss?)2 / 8म्हणूनच वजन कमी करण्यासाठी तुमच्या दुपारच्या जेवणात कोणते पदार्थ किती प्रमाणात असायला पाहिजे, याविषयी आहारतज्ज्ञ दिपशिखा जैन यांनी सांगितलेली आणि एनडीटीव्हीने प्रकाशित केलेली ही माहिती एकदा बघा. 3 / 8आहारतज्ज्ञ असं सांगतात की सगळे पदार्थ योग्य प्रमाणात तुम्ही खात असाल तर तुमचं वजन नियंत्रित राहण्यासाठी किंवा कमी होण्यासाठी निश्चितच मदत होऊ शकते. 4 / 8त्यामुळे सगळ्यात आधी तुमच्या दुपारच्या जेवणाची सुरुवात सलाड खाऊन करा. तुमच्या जेवणाचा साधारण पाव हिस्सा सलाड असायला हवे.5 / 8त्यानंतर तुम्ही जेवणात वाटीभर वरण किंवा पनीर आणि भाजी घेतली पाहिजे. हे प्रोटीनयुक्त पदार्थ भरपूर प्रमाणात खाणे गरजेचे आहे.6 / 8दही हे उत्तम प्रोबायोटिक मानले जाते. दह्यामध्ये असणारे घटक तुमची पचनक्रिया अधिक चांगली करते. त्यामुळे दुपारच्या जेवणात दही नियमितपणे खा.7 / 8वरील सर्व पदार्थ खाऊन झाल्यानंतर सगळ्यात शेवटचे महत्त्व पोळी किंवा भाकरीला द्या. एकाच धान्याची पोळी किंवा रोटी खाण्यापेक्षा मल्टीग्रेन रोटी खाण्यास प्राधान्य द्या.8 / 8अशा पद्धतीचं जेवण केल्यास निश्चितच वजन कमी होण्यास मदत होईल. आणखी वाचा Subscribe to Notifications