1 / 11केसांच्या, त्वचेच्या सौंदर्यसाठी कोरफड जशी महत्त्वाची ठरते, तशीच ती खूप आरोग्यदायी आहे. 2 / 11वजन कमी करण्यासाठीही कोरफडीचा खूप फायदा होतो. आहारतज्ज्ञ रिषिका मितू यांनी हिंदुस्थान टाईम्सशी बोलताना कोरफडीच्या नियमित सेवनामुळे आरोग्यावर काय परिणाम होतात, याची माहिती दिली आहे.3 / 11कोरफडीमुळे पचनक्रिया आणि चयापचय क्रिया या दोन्हीला चांगला वेग येतो. त्यामुळे खाल्लेल्या अन्नाचे व्यवस्थित पचन होते आणि शरीरावर अतिरिक्त चरबी साठून राहण्याचे प्रमाण कमी होत जाते.4 / 11कोरफडीमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते. तसेच वारंवार भूक लागत नाही. 5 / 11शरीरात पाणी खूप साचून राहत असेल तरीही शरीरावर सूज येते आणि वजन वाढलेले वाटते. अशापद्धतीची शरीरावरची सूज कमी करण्यासाठीही कोरफड उपयुक्त ठरते. 6 / 11बॉडी डिटॉक्स करण्यासाठी म्हणजेच शरीरातून विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठीही कोरफडीची मदत होते.7 / 11हे सगळे फायदे करून घ्यायचे असतील आणि वजन कमी करायचे असेल तर जेवणाच्या १४ ते १५ मिनिटे आधी कोरफडीचा ज्यूस प्यावा. त्यामुळे खूप लवकर वजन कमी होईल, असे आहातज्ज्ञ सांगतात. 8 / 11कोरफडीचा ज्यूस नुसता प्यायला जात नसेल तर एखाद्या भाजीच्या किंवा फळाच्या ज्यूसमध्ये टाकून प्यावा.9 / 11सकाळी रिकाम्यापोटी १ ग्लास कोमट पाण्यात एखादा चमचा कोरफडीचा ज्यूस टाकून प्यावा.10 / 11कोरफडीचा गर आणि मध एकत्र करूनही तुम्ही कोरफडीचे सेवन करू शकता.11 / 11तसेच कोरफडीचा गर आणि लिंबूपाणी असं एकत्र करून प्यायलं तरी चालतं. वरीलपैकी जी पद्धत तुम्हाला आवडेल त्यापद्धतीने काही दिवस कोरफडीचा गर सेवन करून पाहा. वजन कमी होण्यास नक्कीच मदत होईल.