डाएटींग- व्यायाम न करताही वजन कमी करण्याच्या ६ भन्नाट ट्रिक, वाढलेली चरबी झरझर उतरेल By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2024 12:10 PM 1 / 9वाढतं वजन कमी कसं करायचं, या चिंतेत सध्या अनेक जण आहेत. कारण बैठ्या कामाचे वाढलेले तास, व्यायामाचा अभाव, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी अशा गोष्टींमुळे बऱ्याच जणांचं वजन वाढत चाललं आहे.2 / 9वाढतं वजन कमी करण्यासाठी डाएटींग करणे, व्यायाम करणे असे पर्याय आहेत. पण डाएटींग करणे अनेकांना जमत नाही आणि व्यायाम करण्याचा कंटाळा येताे. किंवा व्यायामासाठी त्यांच्याकडे वेळ नसतो. मग असं असताना वजन कसं कमी करायचं असा प्रश्न पडला असेल तर ही माहिती एकदा वाचा.. 3 / 9या काही गोष्टी नियमितपणे केल्या तर वजन नक्कीच कंट्रोलमध्ये ठेवता येईल आणि वाढलेलं वजन उतरवता येईल. त्यासाठी बघा नेमकं काय करायचं.. 4 / 9घरच्या स्वयंपाकात थोडा बदल केला तर वजन आटोक्यात येऊ शकतं. तेल, तूप, साखर, मीठ हे पदार्थ कमी वापरून प्रोटीनयुक्त आहारावर भर द्या. 5 / 9काही झालं तरी बाहेरचे पदार्थ खाणार नाही, असं ठरवा आणि ते पाळा. तुम्ही बाहेरचे पदार्थ टाळून घरच्या जेवणावर भर दिला तरी वजन नियंत्रित राहील. 6 / 9फायबरयुक्त आहार जास्तीतजास्त घ्या. यामुळे बराच वेळ पोट भरल्यासारखं वाटतं आणि त्यामुळे मग आपोआपच वजन वाढीसाठी कारणीभूत ठरणारे इतर काही पदार्थ खाल्ले जात नाहीत.7 / 9दही, ताक, योगर्ट असे प्रोबायोटीक पदार्थ तुमच्या आहारात असू द्या. त्याने पचनक्रिया चांगली होते.8 / 9रात्रीचे जागरण टाळा. लवकर झोपा आणि ७ ते ९ तासांची पूर्ण झोप घ्या. जागरण केल्यामुळे हार्मोन्सचे संतुलन बिघडते आणि त्यामुळेही वजनावर परिणाम होतो.9 / 9जेवत असताना टीव्ही, मोबाईल बघणं टाळा. तुमच्या जेवणावर पुर्ण लक्ष केंद्रित करा. यामुळे खाल्लेल्या अन्नाचं व्यवस्थित पचन तर होईलच पण ओव्हरइटींगही टळेल. आणखी वाचा Subscribe to Notifications