Join us   

पाठ- कंबर- गुडघे दुखतात? रोजच्या जेवणात 'ही' चटणी खा, भरपूर कॅल्शियम मिळेल- दुखणं पळेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2024 2:22 PM

1 / 7
हल्ली कमी वयातच गुडघे दुखू लागतात. पाठ- कंबर आखडून जाते. त्यामुळे हाडांच्या दुखण्याचा आणि वय वाढण्याचा आता तसा काही संबंधच राहिलेला नाही. कारण तरुण मुलांच्या मागेही हे दुखणं लागत आहे. (best home remedies to reduce knee pain, back pain)
2 / 7
हाडांचं दुखणं वाढण्यामागचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे शरीरात कॅल्शियमची कमतरता असणं. गुडघे, पाठ, कंबर ठणकू लागली की मग आपण कॅल्शियमच्या गोळ्या सुरू करतो. (how to get rid of calcium deficiency?)
3 / 7
पण त्याऐवजी कडिपत्त्याची १ चमचा चटणी तुमच्या आहारात जर तुम्ही दररोज न चुकता घेतली तर त्यामुळे तुमच्या शरीरातील कॅल्शियमची कमतरता भरून निघू शकते, असं वैद्य सुयोग दांडेकर यांनी sohmkurulkr या इन्स्टाग्राम पेजला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. (calcium rich food)
4 / 7
ते म्हणतात की भरपूर कॅल्शियम मिळण्याचा सगळ्यात सोपा उपाय म्हणजे कडिपत्ता. आता आपण पोहे, उपमा, वरण किंवा इतर पदार्थांमध्ये कडिपत्ता घालतो, पण त्या खाताना मात्र तो वेगळा काढून टाकतो. असं केल्याने कॅल्शियमची गरज भरून निघणार नाही.
5 / 7
म्हणूनच तो थोडा चवदार करून चटणीच्या रुपात खाणं अधिक चांगलं. कडिपत्त्याची चटणी करण्याची सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे तव्यावर कडिपत्ता, मिरच्या, लसूण पाकळ्या थोडं तेल टाकून परतून घ्या. (how to make kadipatta chutney?)
6 / 7
थंड झाल्यानंतर थोडे जिरे, मीठ टाकून मिक्सरमधून वाटून घ्या. ही चटणी ४ ते ५ दिवस चांगली टिकते.
7 / 7
कडिपत्त्यामध्ये असणारं कॅल्शियम शरीरात चांगल्या पद्धतीने शोषून घेतलं जावं यासाठी त्याला व्हिटॅमिन सी ची जोड द्यावी लागते. त्यामुळे या चटणीमध्ये तुम्ही थोडं लिंबू पिळा. त्यामुळे चटणीची पौष्टिकता अधिक वाढेल.
टॅग्स : वेट लॉस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्सअन्नपाककृती