कशाला महागडे प्रोटीन शेक पिता? 'हे' स्वस्तात मस्त पदार्थ खा, भरपूर प्रोटीन्स मिळून ठणठणीत राहाल

Published:December 7, 2024 03:15 PM2024-12-07T15:15:51+5:302024-12-07T15:33:50+5:30

कशाला महागडे प्रोटीन शेक पिता? 'हे' स्वस्तात मस्त पदार्थ खा, भरपूर प्रोटीन्स मिळून ठणठणीत राहाल

शाकाहारी लोकांच्या शरीरात नेहमीच प्रोटीन्सची कमतरता असते. त्यासाठी मग अनेक जण बाजारात विकत मिळणारे महागडे प्रोटीन शेक पितात. पण आपल्या रोजच्या जेवणात जर काही डाळी, कडधान्ये तुम्ही योग्य प्रमाणात घेतली तर प्रोटीन्सची कमतरता बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकते (Indian dal and legumes that gives maximum amount of proteins). असे पदार्थ नेमके कोणते ते पाहूया...(protein rich superfood)

कशाला महागडे प्रोटीन शेक पिता? 'हे' स्वस्तात मस्त पदार्थ खा, भरपूर प्रोटीन्स मिळून ठणठणीत राहाल

प्रोटीन्सच्या बाबतीत राजमा अतिशय उत्तम मानला जातो. १०० ग्रॅम शिजवलेला राजमा जर तुम्ही खाल्ला तर त्यातून तुम्हाला ८.७ ग्रॅम प्रोटीन्स मिळतात.

कशाला महागडे प्रोटीन शेक पिता? 'हे' स्वस्तात मस्त पदार्थ खा, भरपूर प्रोटीन्स मिळून ठणठणीत राहाल

भरपूर प्रोटीन देणारा दुसरा पदार्थ आहे उडदाची डाळ. डोसा, इडली या माध्यमातून तुम्ही उडदाची डाळ खाऊ शकता. सामान्यपणे १०० ग्रॅम शिजवलेल्या उडीद डाळीतून ८.१ ग्रॅम एवढे प्रोटीन मिळते.

कशाला महागडे प्रोटीन शेक पिता? 'हे' स्वस्तात मस्त पदार्थ खा, भरपूर प्रोटीन्स मिळून ठणठणीत राहाल

हरभऱ्याची डाळ हा सुद्धा प्रोटीनचा एक चांगला स्त्रोत आहे. त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे मधुमेह असणाऱ्या लोकांनाही चणा डाळ किंवा हरभरा डाळ चालते. धिरडे, पराठे, पिठलं या माध्यमातूनही तुम्ही हरभऱ्याची डाळ खाऊ शकता.

कशाला महागडे प्रोटीन शेक पिता? 'हे' स्वस्तात मस्त पदार्थ खा, भरपूर प्रोटीन्स मिळून ठणठणीत राहाल

चवळी ही देखील प्रोटीन्सचा एक उत्तम स्त्रोत मानला जातो. सामान्यपणे १०० ग्रॅम चवळीतून ७.५ ग्रॅम प्रोटीन्स मिळतात.

कशाला महागडे प्रोटीन शेक पिता? 'हे' स्वस्तात मस्त पदार्थ खा, भरपूर प्रोटीन्स मिळून ठणठणीत राहाल

तुरीच्या डाळीचे वरण जर तुम्ही भात, पोळी, भाकरी या पदार्थांसोबत रोज नियमितपणे खाल्ले तर त्यातूनही तुम्हाला चांगल्या प्रमाणात प्रोटीन्स मिळू शकतात.

कशाला महागडे प्रोटीन शेक पिता? 'हे' स्वस्तात मस्त पदार्थ खा, भरपूर प्रोटीन्स मिळून ठणठणीत राहाल

मसूर डाळीतून सुद्धा भरपूर प्रमाणात प्रोटीन्स मिळतात. शिवाय त्यातून अमिनो ऍसिड आणि फायबर, लोह हे देखील मिळते.

कशाला महागडे प्रोटीन शेक पिता? 'हे' स्वस्तात मस्त पदार्थ खा, भरपूर प्रोटीन्स मिळून ठणठणीत राहाल

पचायला सोपी आणि हलकी असणारी मूग डाळ हा देखील प्रोटीन्स मिळविण्याचा एक चांगला पर्याय ठरू शकतो.