कशाला महागडे प्रोटीन शेक पिता? 'हे' स्वस्तात मस्त पदार्थ खा, भरपूर प्रोटीन्स मिळून ठणठणीत राहाल By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2024 3:15 PM 1 / 8शाकाहारी लोकांच्या शरीरात नेहमीच प्रोटीन्सची कमतरता असते. त्यासाठी मग अनेक जण बाजारात विकत मिळणारे महागडे प्रोटीन शेक पितात. पण आपल्या रोजच्या जेवणात जर काही डाळी, कडधान्ये तुम्ही योग्य प्रमाणात घेतली तर प्रोटीन्सची कमतरता बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकते (Indian dal and legumes that gives maximum amount of proteins). असे पदार्थ नेमके कोणते ते पाहूया...(protein rich superfood)2 / 8प्रोटीन्सच्या बाबतीत राजमा अतिशय उत्तम मानला जातो. १०० ग्रॅम शिजवलेला राजमा जर तुम्ही खाल्ला तर त्यातून तुम्हाला ८.७ ग्रॅम प्रोटीन्स मिळतात.3 / 8भरपूर प्रोटीन देणारा दुसरा पदार्थ आहे उडदाची डाळ. डोसा, इडली या माध्यमातून तुम्ही उडदाची डाळ खाऊ शकता. सामान्यपणे १०० ग्रॅम शिजवलेल्या उडीद डाळीतून ८.१ ग्रॅम एवढे प्रोटीन मिळते. 4 / 8हरभऱ्याची डाळ हा सुद्धा प्रोटीनचा एक चांगला स्त्रोत आहे. त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे मधुमेह असणाऱ्या लोकांनाही चणा डाळ किंवा हरभरा डाळ चालते. धिरडे, पराठे, पिठलं या माध्यमातूनही तुम्ही हरभऱ्याची डाळ खाऊ शकता. 5 / 8चवळी ही देखील प्रोटीन्सचा एक उत्तम स्त्रोत मानला जातो. सामान्यपणे १०० ग्रॅम चवळीतून ७.५ ग्रॅम प्रोटीन्स मिळतात. 6 / 8तुरीच्या डाळीचे वरण जर तुम्ही भात, पोळी, भाकरी या पदार्थांसोबत रोज नियमितपणे खाल्ले तर त्यातूनही तुम्हाला चांगल्या प्रमाणात प्रोटीन्स मिळू शकतात. 7 / 8मसूर डाळीतून सुद्धा भरपूर प्रमाणात प्रोटीन्स मिळतात. शिवाय त्यातून अमिनो ऍसिड आणि फायबर, लोह हे देखील मिळते. 8 / 8पचायला सोपी आणि हलकी असणारी मूग डाळ हा देखील प्रोटीन्स मिळविण्याचा एक चांगला पर्याय ठरू शकतो. आणखी वाचा Subscribe to Notifications