International Pineapple Day: Interesting facts about pineapple, Benefits of eating pineapple
International Pineapple Day: अननसाविषयी ७ इंटरेस्टिंग गोष्टी, खट्टामिठा अननस खाण्याचे जबरदस्त फायदेPublished:June 27, 2022 07:41 PM2022-06-27T19:41:52+5:302022-06-27T19:48:24+5:30Join usJoin usNext १. व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असणारं अननस हे फळ अनेकांच्या आवडीचं.. जगभरातही हे फळ एवढं प्रसिद्ध आणि इतक्या लोकांच्या आवडीचं आहे की २७ जुन हा दिवस खास International Pineapple Day म्हणून जगभर साजरा केला जातो. २. मुळचं अमेरिकेचं असणारं हे फळं जगभरातच मोठ्या आवडीने खाल्लं जातं. उन्हाळ्यात अननसाचा थंड गार ज्यूस प्यायला मिळाला तर आहाहा... ३. अमेरिकेत International Pineapple Day मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यादिवशी ते लोक एकमेकांकडे जाऊन अननस खातात. अननसाचा ज्यूस, अननस केक यासारखे अननसाचे वेगवेगळे पदार्थ त्यादिवशी हमखास बनवले जातात. ४. अननसाचं रोपटं अतिशय छोटंसं असतं. जमिनीपासून अवघं दोन- अडीच फूट झाड वाढतं आणि त्याला अननस येतात. ५. वजन कमी करण्यासाठी अननस खाणं अतिशय उपयुक्त ठरतं. कारण अननस खाल्ल्याने शरीरातील लेप्टीन हार्मोन्सचं सिक्रीशन संतुलित होऊन वजन वाढीवर आपोआप नियंत्रण येतं. ६. दमा, कफ असा त्रास असेल तर नियमितपणे अननस खायला हवं. ७. अननसामध्ये कॅल्शियम, मँगनिज मोठ्या प्रमाणात असल्याने हाडांच्या मजबुतीसाठी अननस खाणं अतिशय फायद्याचं असतं. ८. अनननसामध्ये फायबर मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे आतड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी अननस नियमित खावं. ९. व्हीटॅमिन सी आणि बिटा केरॅटीन अननसामध्ये भरपूर प्रमाणात असल्याने त्वचा आणि केसांसाठी अननस खाणं चांगलं. १०. शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवून अशक्तपणा कमी करण्यासाठी अननस महत्त्वाचे आहे. टॅग्स :वेट लॉस टिप्सफळेआरोग्यहेल्थ टिप्सWeight Loss TipsfruitsHealthHealth Tips