वजन वाढू नये म्हणून कतरिना कैफ खाण्यापिण्याची कोणती पथ्ये पाळते? तिच्या डाएटिशियन सांगतात...

Published:July 25, 2024 12:31 PM2024-07-25T12:31:17+5:302024-07-25T12:39:27+5:30

वजन वाढू नये म्हणून कतरिना कैफ खाण्यापिण्याची कोणती पथ्ये पाळते? तिच्या डाएटिशियन सांगतात...

वजन वाढलेली कतरिना कैफ आपण आतापर्यंत कधीच पाहिलेली नाही. कारण तिचा तिच्या शरीरावर, वजनावर खूप चांगला कंट्रोल आहे. त्यामुळेच तर ती तिचं वजन आणि फिटनेस दोन्ही अगदी उत्तम पद्धतीने सांभाळू शकते, असं तिच्या डाएटिशियन श्वेता शाह सांगतात.

वजन वाढू नये म्हणून कतरिना कैफ खाण्यापिण्याची कोणती पथ्ये पाळते? तिच्या डाएटिशियन सांगतात...

वजन वाढू नये आणि फिटनेसही व्यवस्थित सांभाळला जावा, यासाठी कतरिना काय करते, याविषयीची माहिती तिच्या डाएटिशियनने नुकतीच एका चॅनलला दिली. यामध्ये त्या म्हणतात की कतरिना तिच्या आहाराकडे एखाद्या औषधाप्रमाणे बघते आणि त्यामुळेच ती जेवढं गरजेचं आहे तेवढंच ते घेते.

वजन वाढू नये म्हणून कतरिना कैफ खाण्यापिण्याची कोणती पथ्ये पाळते? तिच्या डाएटिशियन सांगतात...

आहारविषयक दिलेला कोणताही सल्ला कतरिना कधीच आंधळेपणाने ऐकून तो फॉलो करत नाही. तर त्याची गरज काय आहे, त्याने काय होईल, त्यासाठी काय इतर पर्याय असू शकतात, अशी सगळी माहिती ती आधी घेते आणि त्यानंतरच तो डाएट प्लॅन फाॅलो करते.

वजन वाढू नये म्हणून कतरिना कैफ खाण्यापिण्याची कोणती पथ्ये पाळते? तिच्या डाएटिशियन सांगतात...

श्वेता सांगतात की कतरिनाला आयुर्वेदीक उपचार खूप आवडतात. त्यामुळे ऑईल पुलिंग, शतपावली, नस्य असे उपचार ती नेहमीच करते.

वजन वाढू नये म्हणून कतरिना कैफ खाण्यापिण्याची कोणती पथ्ये पाळते? तिच्या डाएटिशियन सांगतात...

थोड्या थोड्या वेळाने थोडं थोडं खाणं असा तिचा पिंड नाही. ती दिवसातून दोन वेळाच जेवते आणि ते देखील ती नेहमी घरचं अन्नच खाते. शुटिंगच्यावेळी बाहेर असतानाही तिच्यासोबत जसा जमेल तसा तिचा डबा असतोच.

वजन वाढू नये म्हणून कतरिना कैफ खाण्यापिण्याची कोणती पथ्ये पाळते? तिच्या डाएटिशियन सांगतात...

तिची पित्त प्रकृती असल्याने काळ्या मनुकांचं पाणी, बडिशेपाच्या दाण्यांचं पाणी, दुधी भोपळ्याचा ज्यूस असे पदार्थ ती घेतेच. हे नाहीच मिळालं तर पुदिना, कोथिंबीर आणि आवळ्याचा ज्यूस प्यायला तिला आवडतं.

वजन वाढू नये म्हणून कतरिना कैफ खाण्यापिण्याची कोणती पथ्ये पाळते? तिच्या डाएटिशियन सांगतात...

लवकर झोपणे, लवकर उठणे, रोजचा व्यायाम आणि त्याचबरोबर वरीलप्रमाणे आहार असा कतरिनाचा फिटनेस फंडा आहे.