दरवर्षी ठरवता वजन कमी करु पण होतच नाही? यंदा वजन नक्की होईल कमी-वाचा ७ टिप्स...

Updated:December 14, 2024 18:17 IST2024-12-14T17:59:13+5:302024-12-14T18:17:56+5:30

New Year 2025 Tips To Achieve Weight Loss As Per Resolution : New Year's Resolutions for Best Weight Loss : 7 Tips to Achieve New Year Weight Loss Resolutions : नवीन वर्षातील वजन कमी करण्याचा संकल्प फसू नये म्हणून लक्षात ठेवा ७ टिप्स...

दरवर्षी ठरवता वजन कमी करु पण होतच नाही? यंदा वजन नक्की होईल कमी-वाचा ७ टिप्स...

दर वर्षी नवीन येणाऱ्या वर्षानुसार आपण काही ना काही नवा संकल्प (7 Tips to Achieve New Year Weight Loss Resolutions) पूर्ण करायचा असे ठरवतो. परंतु काही संकल्प हे वर्षानुवर्षे आहेत तसेच चालत राहतात, काही केल्या हे संकल्प पूर्ण होतंच नाहीत. त्यापैकीच सगळ्यात कॉमन असा एक संकल्प म्हणजे वजन कमी करणे. वाढलेलं वजन कमी करण्यासाठी आपण अनेक संकल्प करतो परंतु काही केल्या हा संकल्प पूर्ण होत नाही. यासाठी यंदाच्या वर्षी आपलं वाढलेलं वजन कमी करण्याचा संकल्प पूर्ण करण्यासाठी आणि आपल्याला हवा तो वजनाचा आकडा गाठता यावा यासाठी ७ टिप्स लक्षात ठेवूयात (New Year's Resolutions for Best Weight Loss).

दरवर्षी ठरवता वजन कमी करु पण होतच नाही? यंदा वजन नक्की होईल कमी-वाचा ७ टिप्स...

वजन कमी करण्यासाठी काहीजण मोठमोठी आश्वासने देतात आणि ती पूर्ण करू शकत नाहीत. म्हणूनच, जर तुम्ही वजन कमी करण्याचा संकल्प करणार असाल, तर सुरुवात लहान - लहान ध्येयांनी करा. वजन कमी करण्याच्या प्रवासास सुरुवात करा. दर आठवड्याला ०.५ ते १ किलोवजन कमी करण्याचे ध्येय ठेवा. हे हळूहळू साध्य करा, कारण जलद वजन कमी केल्याने शरीर कमकुवत होऊ शकते.

दरवर्षी ठरवता वजन कमी करु पण होतच नाही? यंदा वजन नक्की होईल कमी-वाचा ७ टिप्स...

जेवणाची वेळ काटेकोरपणे पाळणे हा वजन कमी करण्याच्या प्रवासातील एक महत्त्वाचा भाग आहे. दररोज एकाच ठरलेल्या वेळी खाण्यापिण्याच्या किंवा जेवणाच्या सवयी स्वतःला लावा. सकाळी नाश्ता करा आणि दिवसभरात २ ते ३ वेळा हलका नाश्ता घ्या.

दरवर्षी ठरवता वजन कमी करु पण होतच नाही? यंदा वजन नक्की होईल कमी-वाचा ७ टिप्स...

साखरयुक्त गोड पदार्थ आणि जंक फूड, फास्ट फूड खाणे टाळाच. असे पदार्थ सतत खाणे हे वजन वाढण्याचे मुख्य कारण असू शकते. त्याऐवजी, फळे किंवा घरगुती ग्रॅनोला बार, पौष्टिक चिवडा यांसारख्या हलक्याफुलक्या स्नॅक्सचा समावेश करा. चहा - कॉफी पीत असाल तर त्यात देखील साखर घालणे टाळावे.

दरवर्षी ठरवता वजन कमी करु पण होतच नाही? यंदा वजन नक्की होईल कमी-वाचा ७ टिप्स...

वजन कमी करण्यासाठी, आपल्या आहारात पोषक तत्वांचा समावेश असणे आवश्यक आहे. हिरव्या भाज्या, फळे, धान्ये आणि प्रथिनेयुक्त पदार्थ जसे की डाळी, ड्रायफ्रुटस यांचा आहारात समावेश करावा. फायबर युक्त आहार भूकेवर नियंत्रण तर ठेवतेच पण सोबतच पचनक्रिया देखील सुधारते.

दरवर्षी ठरवता वजन कमी करु पण होतच नाही? यंदा वजन नक्की होईल कमी-वाचा ७ टिप्स...

आहारासोबतच नियमित व्यायाम करणेही गरजेचे आहे. दररोज किमान ३० मिनिटे एक्सरसाइज करा. एक्सरसाइजमध्ये आपण योगा, जिम किंवा वेगाने चालणे कार्डिओ आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग असे अनेक प्रकारचे व्यायाम करु शकता.

दरवर्षी ठरवता वजन कमी करु पण होतच नाही? यंदा वजन नक्की होईल कमी-वाचा ७ टिप्स...

झोपेचा आपल्या वजनावर मोठा परिणाम होतो. झोपेच्या कमतरतेमुळे शरीरातील स्ट्रेस हार्मोन्स वाढतात, ज्यामुळे वजन कमी करणे कठीण होते. यासाठीच दररोज ७ ते ८ तासांची पुरेशी झोप घ्या.

दरवर्षी ठरवता वजन कमी करु पण होतच नाही? यंदा वजन नक्की होईल कमी-वाचा ७ टिप्स...

पाणी शरीरातील चयापचय क्रियेचा वेग वाढवण्यास आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते. दिवसभरात किमान ८ ते १० ग्लास पाणी प्या. सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास कोमट पाणी पिणे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते.