'या' पद्धतीने सुकामेवा खाल तर पैसे वाया गेलेच म्हणून समजा! बघा योग्य पद्धत कोणती
Updated:March 14, 2025 09:40 IST2025-03-14T09:35:06+5:302025-03-14T09:40:01+5:30

सुकामेवा जर योग्य पद्धतीने खाल्ला गेला तरच त्याचे सगळे फायदे तुमच्या तब्येतीला होऊ शकतात.
त्यामुळेच सुकामेवा नेमका कशा पद्धतीने खावा, याविषयीची माहिती सांगणारा व्हिडिओ डॉक्टरांनी dr.rohit.sane या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.
यामध्ये डॉक्टर सांगत आहेत की सुकामेव्यामध्ये फायटिक ॲसिड असते. जर तुम्ही तो तसाच खाल्ला तर फायटीक ॲसिडमुळे सुकामेव्यामधले पौष्टिक घटक शरीरामध्ये शोषले जात नाहीत.
सुकामेव्यामध्ये टॅनिन आणि एन्झाईम एनहिबीटर्स असतात जे त्यातील पौष्टिक घटक न्युट्रलाईज होऊ देत नाहीत. जर तुम्ही ते पाण्यात भिजत घातले तरच सुकामेव्यामधले पौष्टिक घटक न्युट्रलाईज होऊन त्याचा लाभ शरीराला मिळू शकतो.
सुकामेवा भिजवून खाल्लयाने त्यात असणारे मॅग्नेशियम, झिंक, आयर्न, प्रोटीन्स शरीरात जास्त चांगल्याप्रकारे शोषून घेतले जातात.
त्यामुळे फक्त बदामच नाही तर इतर सुकामेवाही नेहमी आधी पाण्यात भिजत घालावा आणि मगच खावा..