Protein Rich Food : शरीराला भरपूर प्रोटीन देतात रोजच्या आहारातले ५ पदार्थ; रोज खा, वजन कंट्रोलमध्ये राहील Published:August 6, 2022 12:56 PM 2022-08-06T12:56:43+5:30 2022-08-06T13:19:00+5:30
Protein Rich Food : प्रथिनांचे मुख्य स्त्रोत कोणते आहेत आणि चांगली फिगर येण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी प्रथिनांचा आहारात समावेश कसा करावा असा प्रश्न तुम्हालाही अनेकदा पडत असेल वजन कमी करणे हे अवघड काम आहे यात शंका नाही. अनेकदा असे दिसून येते की लोक जिममध्ये जातात, व्यायाम करतात आणि कॅलरी कमी करतात, तरीही त्यांचे वजन कमी होत नाही. तज्ज्ञांचे मत आहे की वजन कमी करण्यासाठी जेवढी व्यायामाची गरज आहे, तेवढीच आहाराचीही गरज आहे. (5 high protein dishes) निरोगी मार्गाने वजन कमी करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे व्यायामासोबत त्या सर्व गोष्टींचे सेवन करणे, ज्यात कॅलरीज कमी आहेत आणि ज्यामुळे स्नायूंच्या वाढीस चालना मिळते. यासाठी प्रथिने हा सर्वोत्तम उपाय मानला जातो. (According to celebrity nutritionist include these 5 high protein dishes in your diet to weight loss and toned figure)
प्रथिनांचे मुख्य स्त्रोत कोणते आहेत आणि चांगली फिगर येण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी प्रथिनांचा आहारात समावेश कसा करावा असा प्रश्न तुम्हालाही अनेकदा पडत असेल. यासाठी डिटॉक्सप्रीच्या संस्थापक आणि न्यूट्रिशनिस्ट प्रियांशी भटनागर यांनी एका हिंदी वेबसाईटशी बोलताना याबाबत अधिक माहिती दिली आहे.
कमी तेलात बनवलेल्या भाज्या, सॅलेड
हे विविध पौष्टिक भाज्यांचे मिश्रण आहे, ज्यामुळे तुम्हाला प्रथिनांसह विविध पोषक तत्वे मिळतील. ही कमी-कॅलरी इंडो-चायनीज डिश, इतर कोणत्याही रेसिपीपेक्षा वेगळी असून तुमची भूक भागवेल. यात थोड्या तेलात तळून त्यात मसाले टाकले जातात.
फुलकोबी
फुलकोबीमध्ये भरपूर पोषक आणि चरबीचे प्रमाण कमी असते. ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी एक चांगली भाजी आहे. फक्त ते जास्त तेल आणि मसाल्यात बनवू नये. तसेच त्यात बटाटे घालणे टाळावे.
स्प्राऊट चाट
प्रोष्टीक नाश्ता म्हणजे स्प्राउट्स चाट. तुम्ही राजमा, मूग डाळ आणि काळे हरभरे मिक्स करून ही डिश बनवू शकता. त्यत कांदा, टोमॅटो आणि हिरवी मिर्ची, लिंबाचा रस घालून मग सॅलेड बनवा
क्विनोआ सॅलेड
क्विनोआ, बाजरी, राजमा आणि काही भाज्या एकत्र करून सॅलेड बनवा. हे मिश्रण प्रोटीन आणि फायबरचा खजिना आहे. जर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर हा पर्याय तुमच्यासाठी अधिक चांगला ठरू शकतो.