शाकाहारी लोकांना भरपूर प्रोटीन देणारे ६ पदार्थ, महागडे प्रोटीन शेक पिण्याची गरजच नाही

Published:September 26, 2024 11:10 AM2024-09-26T11:10:36+5:302024-09-26T12:11:22+5:30

शाकाहारी लोकांना भरपूर प्रोटीन देणारे ६ पदार्थ, महागडे प्रोटीन शेक पिण्याची गरजच नाही

बहुतांश शाकाहारी लोकांमध्ये प्रोटीन्सची कमतरता दिसून येते. यामध्ये महिलांचे प्रमाण तर खूप जास्त आहे. शाकाहारी जेवणातून पुरेशा प्रमाणात प्रोटीन्स मिळत नाहीत, असा अनेकांचा गैरसमज आहे. (protein rich vegetarian food)

शाकाहारी लोकांना भरपूर प्रोटीन देणारे ६ पदार्थ, महागडे प्रोटीन शेक पिण्याची गरजच नाही

म्हणूनच अभिनेत्री स्मिता शेवाळे हिने डॉक्टरांचा सल्ला घेऊन एक व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला असून यामध्ये तिने प्रोटीन्सची गरज पुरेपूर भागविणारे काही शाकाहारी पदार्थ सांगितले आहेत. हे पदार्थ जर तुम्ही नियमितपणे घेतले तर शरीरात कधीही प्रोटीन्सची कमतरता निर्माण होणार नाही, असं ती सांगते. तिने सांगितलेले पदार्थ नेमके कोणते ते पाहूया.. (how to get maximum protein from diet?)

शाकाहारी लोकांना भरपूर प्रोटीन देणारे ६ पदार्थ, महागडे प्रोटीन शेक पिण्याची गरजच नाही

पहिला पदार्थ आहे कडधान्य आणि डाळी. यामध्येही काबुली चना, हिरवे मूग, मसूर डाळ, चवळी या ४ पदार्थांमध्ये खूप जास्त प्रमाणात प्रोटीन्स असतात. हे पदार्थ शिजवून १ वाटी तरी खायला पाहिजे. यातून १४ ते १८ ग्रॅम एवढं प्रोटीन मिळतं.(protein rich superfood)

शाकाहारी लोकांना भरपूर प्रोटीन देणारे ६ पदार्थ, महागडे प्रोटीन शेक पिण्याची गरजच नाही

दुसऱ्या क्रमांकावर आहेत सुकामेवा, सीड्स किंवा बिया. बदाम, अक्रोड, पिस्ता, भोपळ्याच्या बिया, सुर्यफुलाच्या बिया, चिया सीड्स, जवस या पदार्थांमधूनही खूप प्रोटीन मिळतं. या पदार्थांचा लाडू करूनही तुम्ही खाऊ शकता किंवा मग सकाळी भिजवूनही खाऊ शकता.

शाकाहारी लोकांना भरपूर प्रोटीन देणारे ६ पदार्थ, महागडे प्रोटीन शेक पिण्याची गरजच नाही

भाजलेले शेंगदाणे हा देखील प्रोटीन्सचा एक उत्तम स्त्रोत मानला जातो. रात्रभर पाण्यात भिजवलेले शेंगदाणेही तुम्ही खाऊ शकता.

शाकाहारी लोकांना भरपूर प्रोटीन देणारे ६ पदार्थ, महागडे प्रोटीन शेक पिण्याची गरजच नाही

पनीर, दूध, दही या पदार्थांमधूनही प्रोटीन मिळतं. तसेच ग्रीक योगर्ट हा देखील प्रोटीनचा एक उत्तम स्त्रोत आहे.

शाकाहारी लोकांना भरपूर प्रोटीन देणारे ६ पदार्थ, महागडे प्रोटीन शेक पिण्याची गरजच नाही

पालक आणि मटार या दोन सगळ्यात जास्त प्रोटीन देणाऱ्या भाज्या आहेत.

शाकाहारी लोकांना भरपूर प्रोटीन देणारे ६ पदार्थ, महागडे प्रोटीन शेक पिण्याची गरजच नाही

सोयाबीन आणि टोफू हे देखील प्रोटीन्सचे उत्तम स्त्रोत मानले जातात.

शाकाहारी लोकांना भरपूर प्रोटीन देणारे ६ पदार्थ, महागडे प्रोटीन शेक पिण्याची गरजच नाही

अभिनेत्री स्मिता शेवाळे सांगते की या सगळ्या पदार्थांमधून तर भरपूर प्रमाणात प्रोटीन मिळणार आहेच. पण यापैकी कोणते पदार्थ किती प्रमाणात खाणं तुमच्यासाठी योग्य ठरू शकतं, तुमचं वय, वजन, कामाची पद्धत, इतर आहाराचे प्रमाण यानुसार तुम्हाला किती प्रोटीन्सची गरज आहे, यासाठी एकदा तुमच्या आहारतज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या आणि त्यानुसारच प्रोटीन इनटेक सुरू करा.