हिवाळ्यात पांढराशुभ्र मुळा आठवणीने खा! वाचा मुळा खाण्याचे ७ फायदे- वजनही घटेल-सौंदर्यही खुलेल

Published:November 13, 2024 01:23 PM2024-11-13T13:23:33+5:302024-11-13T14:00:43+5:30

हिवाळ्यात पांढराशुभ्र मुळा आठवणीने खा! वाचा मुळा खाण्याचे ७ फायदे- वजनही घटेल-सौंदर्यही खुलेल

सप्टेंबर ते जानेवारी या काळात मुळा बाजारात मुबलक प्रमाणात मिळत असतो. अनेकांना मुळ्याची चव आवडत नाही. त्यामुळे ते मुळा खाणं टाळतात. पण तुम्हाला ज्या प्रकारे तो आवडेल, त्याप्रकारे आवर्जून खा. कारण पांढराशुभ्र मुळा दिसायला जसा आकर्षक असतो, तसेच त्याचे फायदेही भरपूर असतात.

हिवाळ्यात पांढराशुभ्र मुळा आठवणीने खा! वाचा मुळा खाण्याचे ७ फायदे- वजनही घटेल-सौंदर्यही खुलेल

मुळ्यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे पचन व्यवस्थित होण्यासाठी मुळा फायदेशीर ठरतो. ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे, त्यांनी मुळा आवर्जून खावा.

हिवाळ्यात पांढराशुभ्र मुळा आठवणीने खा! वाचा मुळा खाण्याचे ७ फायदे- वजनही घटेल-सौंदर्यही खुलेल

मुळ्यामध्ये जे सल्फरयुक्त घटक असतात ते शरीर नैसर्गिक पद्धतीने स्वच्छ करण्यासाठी खूप उपयुक्त ठरतात. त्यामुळे किडनी आणि लिव्हरच्या आरोग्यासाठीही मुळा खाणं फायदेशीर मानलं जातं.

हिवाळ्यात पांढराशुभ्र मुळा आठवणीने खा! वाचा मुळा खाण्याचे ७ फायदे- वजनही घटेल-सौंदर्यही खुलेल

मुळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि ॲण्टीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी त्याचा वापर होतो.

हिवाळ्यात पांढराशुभ्र मुळा आठवणीने खा! वाचा मुळा खाण्याचे ७ फायदे- वजनही घटेल-सौंदर्यही खुलेल

मुळ्यामध्ये कॅलरी कमी असतात आणि पाणी जास्त असते. त्यामुळे मुळ्याचे पदार्थ खाल्ल्यानंतर पुढे बराच वेळ भूक लागत नाही. म्हणूनच वजन कमी करणाऱ्या व्यक्तींनाही मुळा खाण्याचा सल्ला दिला जातो.

हिवाळ्यात पांढराशुभ्र मुळा आठवणीने खा! वाचा मुळा खाण्याचे ७ फायदे- वजनही घटेल-सौंदर्यही खुलेल

मुळ्यामध्ये असणारे पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.

हिवाळ्यात पांढराशुभ्र मुळा आठवणीने खा! वाचा मुळा खाण्याचे ७ फायदे- वजनही घटेल-सौंदर्यही खुलेल

मुळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, ॲण्टीऑक्सिडंट्स चांगल्या प्रमाणात असतात त्यामुळे तो त्वचेसाठीही फायदेशीर ठरतो. मुळ्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने त्वचा हायड्रेटेड राहाते.

हिवाळ्यात पांढराशुभ्र मुळा आठवणीने खा! वाचा मुळा खाण्याचे ७ फायदे- वजनही घटेल-सौंदर्यही खुलेल

शरीरावरची सूज कमी करण्यासाठीही मुळा उपयुक्त ठरतो. त्यामुळे अर्थरायटिसचा त्रास असणाऱ्यांनी मुळा आवर्जून खावा.