सद्गुरू सांगतात तब्येत ठणठणीत ठेवण्यासाठी महिलांनी 'हे' धान्य नेहमीच खावं... हाडं होतील मजबूत
Updated:December 26, 2023 14:19 IST2023-12-26T14:04:39+5:302023-12-26T14:19:26+5:30

सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी महिलांना त्यांच्या आरोग्याबाबत केलेली ही सूचना प्रत्येकीने पाळावी अशीच आहे. तब्येत ठणठणीत ठेवायची तर त्यांनी सांगितलेल्या धान्याचे पदार्थ नियमितपणे आपल्या आहारात असायलाच पाहिजेत.
महिला घरातल्या प्रत्येकासाठी भरपूर करतात. पण स्वत:च्या तब्येतीकडे मात्र दुर्लक्ष करतात. यामुळेच मग बहुतांश महिलांना कमी वयातच तब्येतीच्या वेगवेगळ्या तक्रारी सुरू होतात.
म्हणूनच आरोग्याच्या तक्रारी नको असतील तर प्रत्येक महिलेने नियमितपणे नाचणीचे वेगवेगळे पदार्थ आहारात घ्यायलाच पाहिजेत. कारण नाचणी हे खऱ्या अर्थाने महिलांसाठी एक फिमेल फ्रेंडली धान्य आहे, असं सद्गुरू सांगतात.
इतर कोणत्याही धान्याच्या तुलनेत नाचणीमध्ये खूप जास्त प्रमाणात लोह असते. बहुतांश महिलांना ॲनिमिया, हिमोग्लोबिनची कमतरता असा त्रास असतोच. त्यामुळे हा त्रास कमी करण्यासाठी नाचणी अतिशय उपयुक्त ठरते.
बाळंतपणानंतर बहुतांश महिलांना पाठदुखी, कंबरदुखी असा त्रास सुरू होतो. त्यामुळे हाडांच्या बळकटीसाठी महिलांनी नियमितपणे नाचणी खावी. नाचणीमध्ये कॅल्शियमचे प्रमाणही खूप जास्त असते.
त्यामुळे नाचणी सत्व, नाचणीचा उपमा, नाचणीचे पराठे अशा कोणताही तुमचा आवडीचा पदार्थ खा. पण आठवड्यातून ठराविक दिवस तरी पोटात नाचणी अवश्य जाऊ द्या.