सद्गुरू सांगतात तब्येत ठणठणीत ठेवण्यासाठी महिलांनी 'हे' धान्य नेहमीच खावं... हाडं होतील मजबूत By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2023 2:04 PM 1 / 6सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी महिलांना त्यांच्या आरोग्याबाबत केलेली ही सूचना प्रत्येकीने पाळावी अशीच आहे. तब्येत ठणठणीत ठेवायची तर त्यांनी सांगितलेल्या धान्याचे पदार्थ नियमितपणे आपल्या आहारात असायलाच पाहिजेत.2 / 6महिला घरातल्या प्रत्येकासाठी भरपूर करतात. पण स्वत:च्या तब्येतीकडे मात्र दुर्लक्ष करतात. यामुळेच मग बहुतांश महिलांना कमी वयातच तब्येतीच्या वेगवेगळ्या तक्रारी सुरू होतात.3 / 6म्हणूनच आरोग्याच्या तक्रारी नको असतील तर प्रत्येक महिलेने नियमितपणे नाचणीचे वेगवेगळे पदार्थ आहारात घ्यायलाच पाहिजेत. कारण नाचणी हे खऱ्या अर्थाने महिलांसाठी एक फिमेल फ्रेंडली धान्य आहे, असं सद्गुरू सांगतात. 4 / 6इतर कोणत्याही धान्याच्या तुलनेत नाचणीमध्ये खूप जास्त प्रमाणात लोह असते. बहुतांश महिलांना ॲनिमिया, हिमोग्लोबिनची कमतरता असा त्रास असतोच. त्यामुळे हा त्रास कमी करण्यासाठी नाचणी अतिशय उपयुक्त ठरते.5 / 6बाळंतपणानंतर बहुतांश महिलांना पाठदुखी, कंबरदुखी असा त्रास सुरू होतो. त्यामुळे हाडांच्या बळकटीसाठी महिलांनी नियमितपणे नाचणी खावी. नाचणीमध्ये कॅल्शियमचे प्रमाणही खूप जास्त असते.6 / 6त्यामुळे नाचणी सत्व, नाचणीचा उपमा, नाचणीचे पराठे अशा कोणताही तुमचा आवडीचा पदार्थ खा. पण आठवड्यातून ठराविक दिवस तरी पोटात नाचणी अवश्य जाऊ द्या. आणखी वाचा Subscribe to Notifications