दिवसाची सुरुवात ३ पदार्थ खाऊन करा! वजन मुळीच वाढणार नाही, राहाल एकदम फिट
Updated:January 11, 2025 14:55 IST2025-01-11T14:49:55+5:302025-01-11T14:55:18+5:30

वजन नेहमीच कंट्रोलमध्ये ठेवायचं असेल किंवा वाढलेलं वजन कमी करायचं असेल तर दिवसाची सुरुवात काही विशिष्ट पदार्थ खाऊन करायला हवी (3 best food to consume on an empty stomach). त्यामुळे पचन, चयापचय व्यवस्थित होऊन शरीर डिटॉक्स होण्यासही मदत होते.(start your day with 3 foods for fast weight loss)
ते पदार्थ नेमके कोणते याविषयीची माहिती आहारतज्ज्ञांनी karankakkad_official या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केली आहे. त्यांनी सांगितलेल्या कोणत्याही ३ पदार्थांपैकी एक पदार्थ काही दिवस नियमितपणे रिकाम्यापोटी खाऊन पाहा.. वजनात नक्कीच फरक जाणवेल.
सगळ्यात पहिला पदार्थ आहे जिऱ्याचं पाणी. हे पाणी तयार करण्यासाठी एक ग्लास पाणी घ्या. त्यात १ टीस्पून जिरे घाला आणि ५ ते ६ मिनिटे उकळून घ्या. त्यानंतर कोमट झाल्यावर हे पाणी प्या. जिऱ्याचं पाणी करण्याचा आणखी एक उपाय म्हणजे रात्री १ ग्लास पाण्यात १ चमचा जिरे टाका आणि रात्रभर ते पाण्यात भिजू द्या. दुसऱ्यादिवशी हे पाणी गाळून पिऊन घ्या.
बदाम, अक्रोड, काजू, अंजीर, मनुका असा सुकामेवा रात्री पाण्यात भिजत घाला आणि दुसऱ्यादिवशी सकाळी भिजवलेला सुकामेवा खा. यामुळे शरीराला आवश्यक ते पोषकपदार्थ, व्हिटॅमिन्स, हेल्दी फॅट्स, फायबर, खनिजे योग्य प्रमाणात मिळतात. मेंदू आणि हृदयाच्या आरोग्यासाठीही ते खूप उत्तम आहे.
सकाळी रिकाम्यापोटी नारळाचं पाणी पिणंही खूप फायदेशीर ठरते. इलेक्ट्रोलाईट्स आणि ॲण्टीऑक्सिडंट्स भरपूर असल्याने त्वचेसाठीही ते खूप फायद्याचं आहे.
सकाळी रिकाम्या पोटी हंगामी फळं खाणंही आरोग्यदायी आहे असं डॉक्टर सांगतात. कारण त्यातून भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स, फायबर आणि ॲण्टीऑक्सिडंट्स मिळतात. त्यामुळे पचनक्रिया अधिक चांगली होण्यासही मदत होते. पण लिंबूवर्गीय फळं सकाळी रिकाम्यापोटी खाणं टाळावं.