वजन- शुगर वाढू नये म्हणून जेवताना कोणता पदार्थ कधी खावा? डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचा खास सल्ला By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2024 5:07 PM 1 / 7आपण कशा पद्धतीने जेवतो, कोणते पदार्थ जास्त खातो, आपल्या ताटात किती आणि कोणते पदार्थ असतात, यावर आपलं वजन खूप जास्त अवलंबून असतं (weight loss tips). त्यामुळे वजन वाढू द्यायचं नसेल तर आपल्या ताटातील प्रत्येक पदार्थ योग्य प्रमाणात असावा. (how to control weight and sugar)2 / 7वजन वाढू द्यायचं नसेल किंवा डायबिटीज असणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू द्यायचे नसेल तर जेवणाची पद्धत कशी असावी, कोणता पदार्थ आधी खावा, कोणता पदार्थ नंतर खावा, याविषयी डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी दिलेली माहिती sarvakaahi या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.3 / 7आपल्याला माहितीच आहे की डॉ. जगन्नाथ दीक्षित हे दोन वेळा जेवणाचा सल्ला देतात. त्यानुसार जेवणाची सुरुवात ड्रायफ्रूट्स खाऊन करा असं ते सांगतात.4 / 7जर तुम्हाला मधुमेह नसेल तर एखादा गोड पदार्थ किंवा फळ खाऊनही जेवणाची सुरुवात करू शकता.5 / 7त्यानंतर सलाड खा. एक मध्यम आकाराचा टोमॅटो आणि मध्यम आकाराची काकडी चिरल्यानंतर जेवढे आकारमान असेल साधारण तेवढ्या प्रमाणात सलाड खावं.6 / 7त्यानंतर जेवढं सलाड खाल्लं असेल तेवढंच मोड आलेलं कडधान्य खा.7 / 7हे तीन पदार्थ खाल्ल्यानंतर मग जेवढी भूक असेल तेवढ्यात तुम्ही जेवणातले बाकीचे पदार्थ खा. अशा पद्धतीने जेवल्यास तुम्हाला फायबर, प्रोटीन्स, खनिजे, व्हिटॅमिन्स असं सगळंच योग्य प्रमाणात मिळतं. यामुळे वजन, शुगर तर नियंत्रित राहातेच, पण तब्येतही उत्तम राहील, असं डॉ. दीक्षित सांगतात. आणखी वाचा Subscribe to Notifications