'हा' त्रास असणाऱ्या लोकांनी लसूण खाणं टाळावं, बघा लसूण खायचाच असल्यास कसा- किती खावा? By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2024 9:09 AM 1 / 8लसूण आरोग्यासाठी गुणकारीच आहे, पण तरीही तब्येतीच्या काही तक्रारी असतील, तर मात्र कच्चा लसूण खाणं टाळलेलं बरं. 2 / 8कोणत्या प्रकारचा त्रास असेल तर कच्चा लसूण खाणं टाळावं, याविषयीची माहिती lokmat_sakhi या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.3 / 8यामध्ये असं सांगितलं आहे की ज्या लोकांना वारंवार ॲसिडिटीचा त्रास होतो, अशा लोकांनी कच्चा लसूण खाणं टाळावं.4 / 8काही लोकांच्या घामाची खूपच जास्त दुर्गंधी येते. काही लोकांच्या तोंडाचाही कायम वास येतो. अशा लोकांनी लसूण खाऊ नये. कारण त्यामध्ये सल्फरचं प्रमाण खूप जास्त असतं.5 / 8ज्यांची पचनशक्ती थोडी कमजोर आहे, अशा लोकांनीही कच्चा लसूण खाणं टाळावं. कारण लसूणामध्ये असणारा फ्रुक्टोज हा घटक तुमच्यासाठी आणखी त्रासदायक ठरू शकतो.6 / 8लसूण खाल्ल्याने रक्त पातळ होण्यास मदत होते. जर तुम्ही रक्त पातळ होऊ नये म्हणून औषधोपचार घेत असाल तर लसूण खाणं टाळा.7 / 8रक्त पातळ होण्यास लसूण उपयुक्त ठरतो. म्हणून कोणत्याही प्रकारचं ऑपरेशन झाल्यानंतर काही दिवस लसूण खाणं टाळावं.8 / 8एका दिवशी १ ते २ पाकळ्या एवढ्याच प्रमाणात लसूण खावा. एखाद्या पदार्थामध्ये परतून किंवा शिजवून घातलेला लसूण खाणे अधिक चांगले. आणखी वाचा Subscribe to Notifications