पोट सुटलंय-कंबरेचा शेप बिघडला? 'या' ५ प्रकारचे ज्यूस प्या, वजन आपोआप घटेल-फिट दिसाल By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2024 3:05 PM 1 / 7खराब जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे लोकांमध्ये वजन वाढण्याची समस्या उद्भवत आहे. वाढलेलं वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करतात. अनेकदा हे उपाय करूनही हवातसा परिणाम दिसून येत नाही. रोजच्या आहारात काही ड्रिंक्सचा समावेश करून तुम्ही वजन नियंत्रणात ठेवू शकता. 2 / 7काकडीत हायड्रेटींग गुणधर्म असतात. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. यात जवळपास ८० टक्के पाणी असते. याच्या सेवनाने पोट दीर्घकाळ भरलेलं राहतं.3 / 7ताकात हायड्रिंग गुणधर्म असतात. ताकाच्या सेवनाने शरीरातील एक्स्ट्रा फॅट कमी होण्यास मदत होते. यात प्रोबायोटिक्स असतात ज्यात हेल्दी बॅक्टेरियाज असतात. ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहते. 4 / 7संत्री, मोसंमी, नारळपाणी, सफरचंद या वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूस वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात. यात व्हिटामीन सी मोठ्या प्रमाणात असते. ज्यामुळे मेटाबॉलिझ्म वेगाने वाढण्यास मदत होते. 5 / 7वजन कमी करण्यासाठी पुदीना आणि लिंबू पाण्याचे सेवन करू शकता. ज्यामुळे शरीरात जमा झालेले विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते. याशिवाय शरीर हायड्रेट राहते.6 / 7पालकाचे सूप, पालकाची स्मूदी यांचे सेवन केल्याने पचनक्रिया चांगली राहते. बराचवेळ भूक लागत नाही आणि आरोग्याच्या समस्या उद्भवत नाहीत. 7 / 7नियमित व्यायाम, पुरेशी झोप, तेलकट पदार्थ टाळणं, पॅक फूड न खाणं वजन कमी करण्यासाठी फार महत्वाचे आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications