Top 7 Foods Highest in Protein : ७ व्हेज पदार्थ देतात नॉनव्हेजपेक्षा जास्त प्रोटीन, राहाल ठणठणीत- प्रोटीनची चिंताच नको Published:September 7, 2022 02:11 PM 2022-09-07T14:11:46+5:30 2022-09-07T14:38:23+5:30
Top 7 Foods Highest in Protein : केवळ कॅल्शियमच नाही तर दुधातही प्रथिने भरपूर असतात. दूध हा उच्च दर्जाच्या प्रथिनांचा उत्कृष्ट स्रोत असू शकतो चांगल्या आरोग्यासाठी प्रोटिन्स किती महत्वाचे असतात याची तुम्हला कल्पना असेलच. जर तुम्ही पुरेशा प्रमाणात प्रोटीनचे सेवन केले नाही तर त्याचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो. प्रथिने वनस्पती आणि प्राणी दोन्ही स्त्रोतांमध्ये आढळतात. (Top 10 Foods Highest in Protein) मासांहाराव्यतिरिक्त प्रथिनांच्या प्रमुख वनस्पती स्त्रोतांमध्ये काजू, बिया, बटाटे, संपूर्ण धान्य आणि शेंगा याचा समावेश होतो. (Top 10 proteins based food high protein rich food)
ग्रीक योगर्ट
दुग्धजन्य पदार्थ ग्रीक दही हे खूप जाड दही असते. हे अतिशय चवदार आणि पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे. ते बाजारात सहज उपलब्ध आहे. तुम्ही तुमच्या आहारात साध्या दह्याऐवजी ग्रीक योगर्टचा समावेश करू शकता. आपण त्यात चवीसाठी मीठ, अक्रोड किंवा मध घालू शकता.
हाय प्रोटिन दूध
केवळ कॅल्शियमच नाही तर दुधातही प्रथिने भरपूर असतात. दूध हा उच्च दर्जाच्या प्रथिनांचा उत्कृष्ट स्रोत असू शकतो. याशिवाय एक ग्लास दुधाला संध्याकाळचा परफेक्ट ब्रेकफास्ट म्हणता येईल. ज्यामुळे तुमचे पोट जास्त काळ भरलेले राहते.
नट्स आणि बिया
संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी अक्रोड, बदाम आणि पिस्ता यांसारखे काही ड्राय फ्रूट्स सर्वोत्तम मानले जाऊ शकतात. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर ते हृदयविकाराचा धोका कमी करू शकतात आणि तुमच्यासाठी एक आदर्श नाश्ता देखील आहेत, परंतु ड्रायफ्रुट्स आणि बियांमध्ये कॅलरीज जास्त असतात, त्यामुळे ते मर्यादित प्रमाणात घ्या.
पनीर
पनीर हा शाकाहारी प्रोटिनचा उत्तम सोर्स आहे. पनीरमध्ये अनेक पोषक घटक असतात. जे प्रोटिन्सची कमतरता दूर करतात आणि पनीर हे सहज उपलब्ध होणारं आहे.
हाय प्रोटिनयुक्त डाळ
डाळी हे शाकाहारी लोकांसाठी प्रथिनांचे सुप्रसिद्ध स्त्रोत आहेत. केवळ प्रथिनेच नाही तर डाळींमध्ये फायबर, फोलेट, मॅंगनीज, लोह, फॉस्फरस, पोटॅशियम आणि बी जीवनसत्त्वे यांसारखी पोषक आणि खनिजे भरपूर असतात. यामधील प्रथिने हृदयाचे आरोग्य राखण्यास, पचनास मदत करण्यास आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते.
ओट्स
सहसा न्याहारी दरम्यान ओट्स खाल्ले जाते, ओट्स हे प्रथिनांचे उत्कृष्ट स्त्रोत आहेत. हे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्समध्ये समृद्ध आहेत. तुम्ही ताजी फळे आणि नट यांसारख्या आरोग्यदायी पदार्थांसह ओट्स खाऊ शकता.
बटाटा
बटाट्याला प्रथिनांसह इतर पोषक तत्वांचा चांगला स्रोत आहेत. एक उकडलेला मॅश केलेला बटाटा प्रथिने आणि कार्बोहायड्रेट्स सारख्या महत्त्वपूर्ण पोषक तत्वांनी समृद्ध असतो.